शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली… सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

मुंबई तक

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : सर्वोच्च न्यायालयात ९ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातच्या (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर आज (गुरुवारी) संपली. आजच्या पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे (Uddhav Thackeray), शिंदे (Eknath Shinde) गट आणि राज्यपालांच्या बाजूने अखेरचे युक्तीवाद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाची धाकधूक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Eknath Shinde vs Uddhav Thackeray :

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात ९ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातच्या (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर आज (गुरुवारी) संपली. आजच्या पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे (Uddhav Thackeray), शिंदे (Eknath Shinde) गट आणि राज्यपालांच्या बाजूने अखेरचे युक्तीवाद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाची धाकधूक वाढली असून अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray the court has reserved the verdict)

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय घटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसीला मुदतवाढ देण्याच्या याचिकेपासून सुरु झालेला हा खटला आता सरकारच्या घटनात्मक वैधतेवर येऊन ठेपला आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. याशिवाय राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

ठाकरेंचा राजीनामा ठरणार टर्निंग पाईंट :

आजच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना काही प्रश्न विचारले. सरन्यायाधीश म्हणाले, “राज्यपालांनी अधिकारांचा केलेला वापर योग्य नव्हता अशा निष्कर्ष आम्ही काढला, तर काय होईल.” त्यावर सिंघवी म्हणाले, सर्व काही कोसळेल.”

हे वाचलं का?

    follow whatsapp