Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?
5 State Assembly Election Poll Of Polls: लोकसभा 2024 च्या निवडणुकीआधी पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पाहा कोणत्या चॅनलचा पाच राज्यांबाबतचा एक्झिट पोल काय आहे.
ADVERTISEMENT

5 State Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुका आता पार पडल्या आहेत. तेलंगणामध्ये आज (30 नोव्हेंबर) मतदान पार पडल्यानंतर या पाचही राज्यातील निवडणुका पार पडल्या. आता या पाचही राज्यांचे एक्झिट पोल हे समोर आले आहेत. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या या पाचही राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार हे एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलं आहे. याशिवाय इतरही चॅनल्सने याबाबत अंदाज वर्तवले आहेत. याचाच Poll of Polls आपण आता सविस्तरपणे पाहूया.
1. Chhattisgarh Poll of Polls 2023 : छत्तीसगडचा पोल ऑफ पोल्स
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 1 ते 5 जागा मिळतील
पाहा काय आहे छत्तीसगडचा Poll of Polls