‘अटलवाणी ऐकलीत तर कळेल…’ वाजपेयींच्या जयंतीदिवशीच मनसेनं सरकारचे टोचले कान
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपसह अनेक नेत्यांनी त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. मात्र मनसेने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून वाजपेयींच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत सध्या राजकारणाची आणि सत्ताधाऱ्यांच्या राजकीय हेतूवर टीका करत सरकारवरच निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT

Atal bihari vajpayee : देशात कोणत्याच गोष्टीवरून ध्रुवीकरण होता कामा नये, ना धर्माच्या आणि ना जातीच्या आधारावर देशात आणि समाजात दोन गटतट पडू नये असं मत माजी पंतप्रधान (Former Prime Minister) अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत व्यक्त केले होते, त्यांचे ते भाषणही प्रचंड गाजले होते. आज तेच भाषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून शेअर करत, ‘अटलवाणी ऐकलीत तर कळेल की हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज…’ अशी पोस्ट शेअर करून त्यांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.
सत्ताधाऱ्यांना विरोधक नको
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडीओ मनसेने शेअर करत त्यांनी सरकारवर जोरदार टोला हाणला आहे. मनसेच्या अकाऊंटवरून तो व्हिडीओ शेअर करताना त्यांनी काही ओळीही शेअर केल्या आहेत. त्यामध्ये मनसेनं म्हटले आहे की, सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही.
हे ही वाचा >> मनोज जरांगेच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, एका मागून एक लांबवले दागिने
राजकारण सूडबुद्धीचं नव्हतं
मात्र अटल बिहारी यांच्या भाषणाची आठवण करून देत त्यांनी अटलवाणी ऐकलीत तर कळेल की, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. संसदेत सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांना नुकताच निलंबित करण्यात आले आहे. त्यावरूनच हा टोला लगावल्याचे दिसून येत आहे. कारण सरकारला प्रश्न विचारलेले चालत नाहीत असंही त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे.
सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही… पण हि #अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज……………
असो.
राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न… pic.twitter.com/4lWfmriv7v
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 25, 2023
लोकशाही बळकट होवो
तर मनसेने ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त X वर पोस्ट शेअर करत मनसेने वाजपेयींचं मोठंपणही त्यांनी दाखवून दिले आहे. त्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की, पुन्हा या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो! अशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली आहे.