महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’! 2017 मध्ये अहमद पटेलांसोबत राज्यसभा निवडणुकीत नेमंक काय घडलं होतं?

भागवत हिरेकर

राज्यसभा निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरताना दिसतेय. मतदानापर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाने उत्सुकता शिगेला नेलीये. गुजरातमध्ये झालेल्या राजकीय नाट्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र, हरयाणात होताना दिसतेय. त्यामुळे गुजरातमध्ये २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं होतं, याची चर्चा होतेय. तर जाणून घेऊयात काय घडलं होतं २०१७? २०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली होती. तीन जागांसाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यसभा निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरताना दिसतेय. मतदानापर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाने उत्सुकता शिगेला नेलीये. गुजरातमध्ये झालेल्या राजकीय नाट्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र, हरयाणात होताना दिसतेय. त्यामुळे गुजरातमध्ये २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं होतं, याची चर्चा होतेय. तर जाणून घेऊयात काय घडलं होतं २०१७?

२०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली होती. तीन जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एका जागेवर उमेदवार होते काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे अहमद पटेल. दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित होता, पेच होता तिसऱ्या जागेचा.

Live Update : ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झालाय; संजय राऊत भडकले

तिसऱ्या जागेसाठीच भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता. अहमद पटेल यांच्याविरुद्ध भाजपनचे उमेदवार होते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते बलवंत राजपूत. याच निवडणुकीचा निकाल मध्यरात्री लागला होता आणि अहमद पटेल यांनी या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp