Ramdas Kadam : “मला काका म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंनी माझंच खातं घेतलं”
शिवसेना नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आपली भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे यांनी बोलताना आवर घातला पाहिजे तसंच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजूबाजूला जे नाग बसले आहेत ते ओळखले पाहिजेत असं म्हणत टीकेची तोफ डागली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी कसं आपलंच खातं घेतलं ते देखील रामदास कदम यांनी सांगितलं […]
ADVERTISEMENT

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आपली भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे यांनी बोलताना आवर घातला पाहिजे तसंच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजूबाजूला जे नाग बसले आहेत ते ओळखले पाहिजेत असं म्हणत टीकेची तोफ डागली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी कसं आपलंच खातं घेतलं ते देखील रामदास कदम यांनी सांगितलं आहे.
शिवसेना फुटत असताना उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या रामदास कदम यांचा राजकीय प्रवास कसा आहे?
आदित्य ठाकरेंविषयी नेमकं काय म्हणाले आहेत रामदास कदम?
५१ आमदारांनी जे पाऊल उचललं आहे ते नेमकं का? याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. तसंच आदित्य ठाकरे मला काका म्हणायचे. खातं घेताना बरोबर माझंच खातं त्यांनी घेतलं. मी ७० वर्षांचा आहे. आदित्य ठाकरेंना मला साहेब म्हणावं लागतं. आदित्य ठाकरेंनी संयम बाळगयला हवा होता.
दीड वर्ष आदित्य ठाकरे मी पर्यावरण मंत्री असताना माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे. मला काका म्हणायचे.. या अधिकाऱ्यांना बोलवा, सचिवांना बोलवा. बैठक लावा. बाहेरच्या लोकांना येऊन मंत्रालयात बैठका घेता येत नाहीत. तरीही उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून मी बैठका लावल्या. यानंतर सत्ता आल्यावर यांनी माझंच खातं घेतलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतलेल्या शिवसेनेत आपल्याला राहायचं नाही. बेईमानी आमच्या कुणाच्याही रक्तात नाही. मात्र आम्ही सगळे असं का करत आहोत याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या आजूबाजूला असलेल्या स्वार्थी लोकांची साथ सोडली पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम हे मागच्या अडीच वर्षांपासून अस्वस्थ होते. त्यांना सातत्याने डावललं गेल्याची तक्रार त्यांनी केली होती. अशात त्यांनी सोमवारी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. ही बातमी समोर आल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर संतापलेल्या रामदास कदम यांनी रोखठोक भूमिका मांडली. जर मीच स्वतःहून राजीनामा दिला आहे तर हकालपट्टी कशी काय करता असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला आहे. तसंच आदित्य ठाकरेंवरही त्यांन टीका केली आहे.