CM Shinde: अजितदादांचा 'तो' Video माझ्याकडे आहे: मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde vs Ajit Pawar: अजित पवार यांच्या जुन्या व्हिडीओचा उल्लेख करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर टीका(फोटो सौजन्य: Facebook)

Eknath Shinde: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने चहापानाच्या कार्यक्रमासोबत पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं होतं. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेआधी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला होता. यालाच उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेनी अजित पवारांवर निशाणाही साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या एका व्हीडिओचा देखील उल्लेख केला. पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले: (i have that video of ajit pawar see why chief minister eknath shinde said that)

'शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अतिशय संवेदनशील आहे. त्यांच्या पाठिशी उभं राहणारं आहे. आपल्याला माहिती आहे की, मला आठवतंय 7 एप्रिल 2013 रोजी अजितदादांचं एक भाष्य आहे त्यांचा व्हीडिओ आहे माझ्याकडे. त्यामध्ये काय म्हटलं होतं शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यानंतर.. काय देतो ते.. नको इथे ते बोलत नाही मी.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

पाहा मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले:

'ठाकरेंनी सोयरीक एकाशी केली अन् संसार दुसऱ्याशी थाटला'

'आम्हाला जे घटनाबाह्य म्हणतायेत त्यांनी 2019 ला जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली आणि संसार दुसऱ्याशी थाटला. हे सर्व जनतेला माहिती आहे. ज्या मतदारांच्या भावना.. अधिवेशनला बाकी सगळे मुद्दे ठेवायचे आहेत. त्यामुळे कोणी कोणाशी काय केलं हे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तिला हे सगळं समजतंय.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर टीका
'फडणवीस कसली-कसली वेशभूषा करायचे माहित नाही', अजित पवारांची बोचरी टीका

'अजितदादा खोक्यांचा ढीग लावला तर...'

'अजित पवार म्हणाले की, खोके सरकार आहे. यावर मी काही बोललो नाही. पण अजितदादांच्या तोंडून ही भाषा शोभणारी नाही. कारण खोक्यांचा एकावर एक ढीग लावला तर एवढं शिखर होईल की तिथे नजर पोहचणार नाही, आणि पोहचली तर तिथून कडेलोट होईल. यामुळे यावर मी नंतर विधानसभेत बोलेन.' असा इशाराच यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर टीका
Devendra फडणवीसांचा प्लॅन तयार, विधानसभेत करणार मोठा गौप्यस्फोट?

'आम्हाला काय या राज्याचा लवासा करायचा नाही'

'स्थगितीच्या बाबतीत म्हणाल तर अनेक विभागात तरतूद होती दोन हजार कोटींची आणि प्रशासकीय मान्यता 6 हजार, 7 हजार कोटींची. खरं म्हणजे आमदनी अठ्ठनी आणि खर्चा रुपया.. आम्हाला काय या राज्याचा लवासा करायचा नाही.' असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी हाणला.

'अजितदादांचा व्हिडीओ आहे माझ्याकडे...'

'शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अतिशय संवेदनशील आहे. त्यांच्या पाठिशी उभं राहणारं आहे. आपल्याला माहिती आहे की, मला आठवतंय 7 एप्रिल 2013 रोजी अजितदादांचं एक भाष्य आहे त्यांचं व्हीडिओ आहे माझ्याकडे तो. त्यामध्ये काय म्हटलं होतं शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यानंतर.. काय देतो ते.. नको इथे ते बोलत नाही मी.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न यावेळी केला.

दरम्यान, आता अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला नेमकं काय उत्तर देणार आणि विधानसभेत सरकारला कसं घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in