शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार?-राज ठाकरेंचा सवाल

जाणून घ्या आज पुण्यातल्या भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?
If Sharad Pawar thinks Aurangzeb was a Sufi saint, then what we say? Raj Thackeray's question in Pune Rally
If Sharad Pawar thinks Aurangzeb was a Sufi saint, then what we say? Raj Thackeray's question in Pune Rally

Raj Thackeray Pune Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात सभा घेऊन आपण अयोध्या दौरा का रद्द केला हे स्पष्टच सांगितलं. मनसैनिकांना अडकवण्याचा ट्रॅप होता त्यामुळे आपण अयोध्येला जाणं रद्द करत आहोत. मला शिव्या घातल्या तरीही चालतील पण मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं महत्त्व जास्त आहे त्यांना काहीही होऊ नये म्हणून मी दौरा स्थगित केला असं राज ठाकरे म्हणाले. याच भाषणात त्यांनी शरद पवारांवरही टीका केली.

भाषणाला सुरूवात केली त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला बंदिस्त सभा घ्यायची सवय नाही. पण सध्या पाऊस कधीही येऊ शकतो असं वातावरण आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत पावसात का भिजायचं? असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या पावसातल्या भाषणावरून त्यांना टोला लगावला. शरद पवार २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात पाऊस पडला होता तेव्हा भिजले होते. त्या एका भाषणाने सगळं गणित फिरवलं. राज ठाकरेंनी तोच उल्लेख करत शरद पवारांना टोला लगावला.

काय म्हणाले राज ठाकरे शरद पवारांविषयी?

शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार. औरंगजेब शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता. तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी आला होता. मग काय शिवाजी महाराज यांच्यामध्ये आले होते का? स्वतःच्या सोयीसाठी इतिहास बदलू नका असंही म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांनी टीका केली.

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.

राज ठाकरेंनी दौरा रद्द करण्याचं नेमकं कारण काय?

'अयोध्या दौरा तूर्तास रद्द.. अनेकांना वाईट वाटलं.. अनेकांना आनंद झालं, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. म्हणून मी दोन दिवसांचा जरा बफर दिला होता मुद्दामून. काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेन. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकरची घोषणा केली त्यानंतर मी पुण्यात अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरु झालं. की, अयोध्येला येऊ देणार नाही.'

'मग ते सगळं वाढत होतं. मी ते सगळं पाहत होतो. काय चाललंय नेमकं. मला मुंबई, दिल्लीमधून देखील माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातून देखील काही गोष्टी लोकं सांगत होते. की नेमकं काय चाललंय. एक वेळ अशी लक्षात आली की, हा संपूर्ण ट्रॅप आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे.'

'कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली त्याची रसद पोहचवली गेली ज्या गोष्टी गेल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालीए. की, पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला.'

'मी उद्या समजा तिथे हट्टाने जायचं असं ठरवलं असतं मला माहिती आहे की, आपल्या पक्षामधील हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातून अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं गेली असती अंगावर.'

'पण ही माझी महाराष्ट्रातील ताकद हकनाक तिकडे सापडली असती. ती मला सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं जात नाही म्हटल्यावर चार शिव्या पण खायल्या पण मी तयार आहे. माझ्यावर टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे. पोरं नाही अडकू देणार मी.' असं कारण देत राज ठाकरे यांनी दौरा रद्द करत असल्याची नेमकी काय भूमिका होती हे स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in