पुण्यात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारत आंदोलन

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्याने शिवसैनिक आक्रमक
In Pune, Shiv Sainiks are protesting against the photo of rebel MLA Eknath Shinde
In Pune, Shiv Sainiks are protesting against the photo of rebel MLA Eknath Shinde

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

In Pune, Shiv Sainiks are protesting against the photo of rebel MLA Eknath Shinde
Osmanabad: बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना 'खेकडा' म्हणत शिवसैनिकांची घोषणाबाजी

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

In Pune, Shiv Sainiks are protesting against the photo of rebel MLA Eknath Shinde
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा 'रात्रीस राजकीय खेळ'?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?

या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे ऑफिसची तोडफोड झाल्याची घटना घडली. तर त्याच दरम्यान सदाशिव पेठेतील वैद्यकीय मदत कक्षावरील एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे,मंगेश चिवटे यांच्या फोटोला शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडली होती.

Shivsainks Aggressive Against Eknath Shinde in Pune
Shivsainks Aggressive Against Eknath Shinde in Pune

त्यानंतर रविवारी सकाळी कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर यावेळी एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले की, आजपर्यंत शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली आहे.त्या सर्वांची अवस्था काय झाली आहे.ते महाराष्ट्रातील जनतेने पहिली आहे.त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व आमदाराची होणार आहे. तसेच ज्यावेळी हे सर्व आमदार महाराष्ट्रात येतील त्या सर्वांच स्वागत पाहाच,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

In Pune, Shiv Sainiks are protesting against the photo of rebel MLA Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना गुवाहाटीतून आवाहन; महाविकास आघाडीला म्हणाले 'अजगर'

शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडांपैकी हे सर्वात मोठं बंड आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे तसंच राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशी या बंडखोर आमदारांची मागणी आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारमधला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजगरासारखा शिवसेनेला गिळू पाहतो आहे त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकांसाठीच आपण हे आंदोलन पुकारलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तसंच बंडखोरांना जे काही बोलायचं आहे ते माझ्यासमोर येऊन बोला असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट शिंदे समर्थकांचा आहे तर दुसरा गट उद्धव ठाकरेंचा आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची ऑफिसेस फोडाफोडीला सुरूवात झाली आहे. शनिवारीही याचे पडसाद उमटले. आता हे सत्तानाट्य नेमक्या कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in