“अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडल्यानंतर शुक्रवारीच राष्ट्रवादीतील फुटीची स्क्रिप्ट प्रत्यक्षात तयार झाली होती. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सुपूर्द केले.
ADVERTISEMENT

Politics of Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै रोजी राजकीय गदारोळ झाला. अजित पवार यांनी 8 आमदारांसह राजभवनात शपथ घेताच राष्ट्रवाद काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले. हे बंड होण्यापूर्वी पडद्यामागे काही दिवसांत बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडल्या. इतकंच नाही, तर अजित पवारांच्या बंडाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक दिवस आधीच कळलं होतं, अशी खळबळजनक माहिती समोर आलीये.
विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांनी सोडल्यानंतर शुक्रवारीच राष्ट्रवादीतील फुटीची स्क्रिप्ट प्रत्यक्षात तयार झाली होती. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सुपूर्द केले. यामध्ये ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ पक्षनेते (जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते आहेत) बदलून अजित पवार यांची नेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती.
अजित पवारांचा प्लान शरद पवारांना कळला अन्…
अजित पवार यांच्या समर्थक आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. पत्राच्या आधारे विधिमंडळ पक्षनेते या नात्याने अजित पवार यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपण शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू झाली. याआधी शपथविधी सोहळा सोमवारी (3 जुलै) होणार होता, मात्र शरद पवारांना ही गुप्त चर्चा कळली आणि त्यामुळे रविवारी (2 जुलै) सकाळीच अजित पवारांसह इतर मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
शरद पवारांचे मन वळविण्याचा झाला प्रयत्न
शपथ घेतलेल्या 9 नेत्यांसह राष्ट्रवादीचे 10 नेते दोन महिन्यांपासून शरद पवारांना भेटत होते आणि त्यांना सांगत होते की राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त आमदारांना भाजप-सेना सरकारमध्ये सामील व्हायचे आहे. आमदारांनीही पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारांनी ते मान्य केले नाही. त्यानंतर आमदारांनीच निर्णय घेतला. पवार या आघाडीसाठी तयार नसल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा दबाव भाजपकडूनही अजित पवारांसह समर्थक नेत्यांवर होता.