Hemant Soren: ‘या’ महिलेमुळे Kalpana Soren यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली?, असं घडलं तरी काय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

jharkhand ex cm hemant soren wife kalpana soren was leading in race for chief minister how did she suddenly come out of picture
jharkhand ex cm hemant soren wife kalpana soren was leading in race for chief minister how did she suddenly come out of picture
social share
google news

Hemant Soren Wife: रांची: हेमंत सोरेन हे आता झारखंडचे मुख्यमंत्री नाहीत. रांचीच्या कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटकही केली. (jharkhand ex cm hemant soren wife kalpana soren was leading in race for chief minister how did she suddenly come out of picture)

आता चंपई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील. हे एक आश्चर्यचकीत करणारं नाव आहे. कारण आतापर्यंत हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली तेव्हा चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

कल्पना सोरेन मुख्यमंत्री न होणे हे देखील थोडे आश्चर्यकारक आहे कारण त्या मंगळवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही उपस्थित होत्या. राजकीय कुटुंबातून आलेल्या कल्पना सोरेन या राजकारणापासून दूर असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुटुंबातील मतभेदामुळे होऊ शकल्या नाही मुख्यमंत्री?

सोरेन कुटुंब हे झारखंडमधील सर्वात मोठे राजकीय कुटुंब मानले जाते. हेमंत सोरेनच्या आधी त्यांचे वडील आणि JMM प्रमुख शिबू सोरेन हे झारखंडचे तीनदा मुख्यमंत्री होते. अशा स्थितीत कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्याने पक्षात फूट पडण्याचा धोकाही वाढला होता.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दावा केला की, ‘JMM च्या 29 पैकी 18 आमदार हे कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यास तयार नव्हते.’ कल्पना सोरेन यांच्याऐवजी हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी 18 आमदार करत असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> चिडलेले मतदार…सुजय विखेंवर भर कार्यक्रमात पाथर्डीकर भडकले, नेमकं काय घडलं?

एवढेच नाही तर सीता सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आले होते. सीता सोरेन या हेमंत सोरेन यांचा मोठा भाऊ दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत. 2009 मध्ये दुर्गा सोरेन यांचे निधन झाले होते.

ADVERTISEMENT

अशा परिस्थितीत कुटुंबातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करून कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले असते, तर कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकला असता, असे मानले जात आहे.

कुटुंबात कलह होऊ शकतो!

कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले तर कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. मंगळवारी युती सरकारच्या आमदारांची बैठक पार पडली, तेव्हा अनेक आमदार उपस्थित राहिले नाहीत. युती सरकारमध्ये एकूण 49 आमदार आहेत, परंतु त्यापैकी केवळ 35 आमदार बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला न आलेले आमदार कल्पना सोरेन यांच्याऐवजी सीता सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही काळापूर्वी कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सीता सोरेन म्हणाल्या होत्या की, ‘मी सोरेन कुटुंबाची मोठी सून आहे. माझ्या पतीने झारखंडच्या निर्मितीसाठी बराच काळ प्रचार केला होता. मी हेमंत सोरेन यांना माझा उत्तराधिकारी मानलं, इतर कोणालाही नाही.’

एप्रिल 2022 मध्ये सीता सोरेन यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारविरोधात उघडपणे बंड केले होते. सीता सोरेन यांनी हेमंत यांच्यावर निशाणा साधताना खनिज समृद्ध राज्यातील जमिनीची लूट रोखण्यात सरकारला अपयश आल्याचे म्हटले होते.

गुरुजी (शिबू सोरेन) आणि माझ्या पतीच्या जल-जंगल-जमीनची दृष्टी नष्ट होत असल्याचा आरोप सीता सोरेन यांनी केला होता. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवले जात आहे. आमच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा होत्या, पण आता त्यांची निराशा झाली आहे.’

झारखंडमधील चतरा येथील एका खाण कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. झारखंडमधील जंगले बेकायदेशीरपणे बळकावली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

हे ही वाचा>> Hemant Soren: Jharkhand च्या राजकारणात भूकंप, मुख्यमंत्र्यांनाच अटक, ‘हे’ होणार नवे CM!

इतकंच नाही तर सीता सोरेन यांच्या दोन मुली- राजश्री आणि जयश्री यांनीही JMM सरकारशी लढण्यासाठी त्यांच्या आईला साथ दिली होती. 2021 मध्ये त्यांनी ‘दुर्गा सोरेन सेने’ची स्थापना केली, ज्याचा उद्देश झारखंडमधील भ्रष्टाचार आणि लुटीविरुद्ध लढा देणे हा होता.

…म्हणूनही कल्पना सोरेन मुख्यमंत्री झाल्या नाहीत!

कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड न होण्यामागचे एक कारण म्हणजे त्यांचे आमदार नसणे हे देखील मानले जाते. कल्पना सोरेन भलेही राजकीय घराण्यातील असतील, पण त्या आतापर्यंत राजकारणापासून दूर होत्या.

कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर संविधानानुसार त्यांना 6 महिन्यांत विधानसभेच्या सदस्य व्हावं लागलं असतं. म्हणजे एखाद्या जागेवर पोटनिवडणूक झाली असती.

पण निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी सहमती दर्शवली नसती, असे मानले जात आहे. कारण झारखंडमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पोटनिवडणूक झाली नसती तर कल्पना यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT