Sharad Pawar : “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला
Jitendra Awhad Ajit Pawar News : शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी टीका केली. अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर आक्षेप घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT

Jitendra Awhad Ajit Pawar Sharad Pawar Ncp : ‘मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती’, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी केलेल्या या विधानावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. जितेंद्र आव्हाडांनी इतिहास घडून गेलेल्या या राजकीय घटनेचा सगळा घटनाक्रम सांगत अजित पवारांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.
2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट सत्तेत सामील झाला. तेव्हापासून अजित पवार सातत्याने शरद पवारांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर हल्ले करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या राजकीय घटनेबद्दल भाष्य केले.
वसंतदादांचं सरकार, जनता पक्षाचा पाठिंबा
“मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी (शरद पवार) 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते, तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली”, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?
अजित पवारांनी केलेल्या याच विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया उमटली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना या राजकीय घटनेचा सगळा इतिहास सांगितला. इतकंच नाही, तर त्यांच्या राजकीय कर्तृत्वावरही प्रश्न उपस्थित केले.