विधान परिषद निवडणूक: ‘बच्चू कडूंना विनंती करणार’, बावनकुळे असं का म्हणाले?
धनंजय साबळे, प्रतिनिधी (अमरावती) Legislative council election 2023 Bachchu Kadu: अमरावती: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक (Legislative council election) होत आहे. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. यामुळे भाजपची (BJP) बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. […]
ADVERTISEMENT

धनंजय साबळे, प्रतिनिधी (अमरावती)
Legislative council election 2023 Bachchu Kadu: अमरावती: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक (Legislative council election) होत आहे. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. यामुळे भाजपची (BJP) बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (legislative council election 2023 why did chandrashekhar bawankule say that bachchu kadu will be requested)
‘आमदार बच्चू कडू यांना मी नागपूरला आज भेटणार आहे, आपण सत्ताधारी पक्षांमध्ये आहात त्यामुळे सोबत निवडणूक लढवली पाहिजे. अशी विनंती मी बच्चू कडू यांना करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख पक्ष हे विधान परिषदेच्या आखाड्यात असताना त्यात आमदार बच्चू कडूंनीही दंड थोपटले आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षानंही उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेमुळे बच्चू कडूंनी थेट शिंदे-फडणवीसांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.