कोकणात रिफायनरीचा वाद पेटणार? सहा विरोधकांना हद्दपार करण्याचा पोलिसांचा प्रस्ताव
रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधाबरोबरच पाठिंबाही वाढतो आहे. दरम्यान काही रिफायनरी विरोधकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते, मात्र गुन्हे दाखल होऊनही प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन […]
ADVERTISEMENT

रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधाबरोबरच पाठिंबाही वाढतो आहे. दरम्यान काही रिफायनरी विरोधकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते, मात्र गुन्हे दाखल होऊनही प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन जगणं असाह्य झालंय असं म्हणत पोलीस निरीक्षक राजापूर यांनी 6 जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना तडीपारीची नोटीस
त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण ,नरेंद्र जोशी, अमोल बोळे ,नितीन जठार ,दीपक जोशी ,सतीश बाने यांना तडीपारची कारवाई का करू नये यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र तडीपार करण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाहीये.
या सर्व व्यक्तींवर तडीपार कारवाई करण्याआधी त्यांना समक्ष बोलून याबाबत विचारणा करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यांचे समक्ष हजर राहण्या बाबत नोटीस देण्यात आली आहे.
नोटीस मध्ये काय म्हटलं आहे ?
तुम्ही सत्यजित विश्वनाथ चव्हाण रा.चव्हाणवाडी राजापूर ता . राजापूर , जि . रत्नागिरी , तुम्हास महाराष्ट्र पोलीस कायदा सन १ ९ ५१ चे कलम ५ ९ ( १ ) अन्वये कळविण्यात येते की , तुमचेवर खालीलप्रमाणे आरोप आहेत . त्यामुळे जेणेकरुन तुमच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ ( १ ) ( अ ) अन्वये कार्यवाही चालावी याबाबतचे आरोप अभिकथन , सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आहेत . महाराष्ट्र पोलीस कायदा सन १ ९ ५१ चे कलम ५ ९ ( १ ) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी , राजापूर यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक हद्दपार / एसआर -०३ / २०२२ दि . १०/१०/२०२२ अन्वये मला अधिकार दिल्याप्रमाणे…