महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान, ‘…मग भाईगिरी दाखवा ना’

मुंबई तक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं. सीमाभागात निर्माण झालेल्या तणावावरून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला काही सवालही केले. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. मात्र, दोन्ही मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. बेळगावला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं. सीमाभागात निर्माण झालेल्या तणावावरून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला काही सवालही केले.

कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. मात्र, दोन्ही मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. बेळगावला जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात. डरपोक सरकार. यांना महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही.”

Maharashtra Karnataka Border Dispute : ‘तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, ताबडतोब…’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

“यांना महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही. सीमा कुरतडल्या जाताहेत. 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, रक्त शिंपण करून महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कुणी या बाजूला कुरतडतंय, कुणी त्या बाजूला कुरतडतंय आणि हे सरकार षंडासारखं बसलेलं आहे. हे नामर्द सरकार आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची सर्वात जास्त आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp