Maharashtra Political Crisis in SC : सुप्रीम कोर्टाने काय दिला निर्णय?
Maharashtra Political crisis Supreme court Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास 5 सदस्यीय घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालं. सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवस झालेल्या युक्तिवादानंतर निर्णय राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने नबाम रेबिया निकाल प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवायचं की नाही, यावर आणखी सुनावणीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता 21 फेब्रुवारीला […]
ADVERTISEMENT

Maharashtra Political crisis Supreme court Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास 5 सदस्यीय घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालं. सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवस झालेल्या युक्तिवादानंतर निर्णय राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने नबाम रेबिया निकाल प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवायचं की नाही, यावर आणखी सुनावणीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता 21 फेब्रुवारीला या प्रकरणावर सुनावणी होणार असल्यानं, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Nabam Rebia judgment : supreme court decision on maharashtra political crisis)
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गुरुवारी 2016 च्या नबाम रेबिया निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी मोठ्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचा की नाही यावर आपला निर्णय राखून ठेवला होता.
सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने निर्णय सुनावताना म्हटलं की, अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा महाराष्ट्रातील राजकारणावर कसा परिणाम झाला, हे आधी समजावून घ्यावं लागेल. यावर सविस्तर युक्तिवाद ऐकून गुणवत्तेच्या आधारावर हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचं की नाही, यावर निर्णय घेऊ शकतो, असं सरन्यायाधीश यांनी सांगितलं.
5 सदस्यीय घटनापीठापुढेच यांची सुनावणी होणार असून, 21 फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद सुप्रीम कोर्टात होणार आहे.