‘सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवला’, नव्या वादाला फुटलं तोंड
महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT

वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार झाल्याचे फोटो शेअर करत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तर नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? असा टोला यावरून लगावला आहे.
प्रकरण नेमकं काय?
विनायक दामोदर सावरकर यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याबद्दलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बोलघेवडे चॉकलेट बॉय गप्प का? रोहित पवारांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे. रोहित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे असलेला आणि हटवल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.