Ajit Pawar BJP: ‘अनेक आमदारांनी सांगितलं तिथे आमच्या सह्या घेतल्या…’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ADVERTISEMENT

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. या शपथविधीनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, त्यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार आहे. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला. (many mla said that our signatures were taken ncp chief sharad pawar big secret explosion after ajit pawar oath with bjp shiv sena maharashtra politics update today)
‘माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातले काही सदस्य विशेषत: विधीमंडळातील यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण की, ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे.’ असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
2019 मध्येही जेव्हा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पार पडला होता तेव्हा देखील अशाच पद्धतीचा दावा हा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा तसाच दावा करण्यात येत आहे की, आमदारांना निमंत्रित करून नंतर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे अजित पवारांच्या या शपथविधीबाबत पुन्हा एकदा गूढ निर्माण झालं आहे.
पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘…म्हणून मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे..’
‘दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल होतं. त्यामध्ये त्यांनी दोन गोष्ट सांगितल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारी बँकेचा उल्लेख केला त्यासोबत सिंचनाबाबत जी तक्रार होती त्याविषयी उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. असा आरोप केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्या संबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सर्व आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा पंतप्रधानांचा आभारी आहे.’