Manoj Jarange : ‘मुंबई सोडू नका, आरक्षण…’, जरांगे पाटलांनी आमदारांना केली विनंती

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil request mlas before all party meeting antarawali sarati agitation
maratha reservation manoj jarange patil request mlas before all party meeting antarawali sarati agitation
social share
google news

Manoj Jarange Patil Agitatation Antarawali Sarati Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहेत. या बैठकीत अनेक सत्ताधारी आणि विरोधी आमदार उपस्थित राहणार आहे. या बैठकीआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांनी आमदारांना मोठी विनंती केली आहे. ‘गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आणि समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो’, ‘सगळ्या आमदारांनी मुबंई सोडू नये’, ‘सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडावं’, अशी विनंती जरांगे पाटलांनी आमदारांना केली आहे. यासह आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही,अशीही भूमिकाही जरांगे पाटलांनी मांडली. (maratha reservation manoj jarange patil request mlas before all party meeting antarawali sarati agitation)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्य़ा उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. य़ा आठव्या दिवशी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय बैठकीआधी आमदारांना विनंती केली आहे. ”गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या आणि समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो”, ”आमदारांनी मुंबई सोडू नका”. ”विशेष अधिवेशन तातडीन बोलवायला लावा”.”या अधिवेशनात महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी करा” आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडा, अशी विनंती जरांगे पाटलांनी आमदारांना केली.

हे ही वाचा : Washim Crime : मुलाच्या ‘त्या’ सवयीने वैतागला, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं

इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, यावर जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाचं आंदोलन शांततेच सुरू आहे. पण ते बंद व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. पण हे आंदोलन बंद होणार नाही, महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही, अशी बेधडक भूमिका जरांगे पाटलांनी घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठा तरूण शांतच आहे. पण यांना आंदोलन दडपायचं, वातावरण खराब करण्याची इच्छा यांची आहे.इंटरनेट बंद करून चिल्लर चिल्लर चाळे करतायत, अशी टीका जरांगे पाटलांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. एकीकडे बोलुन दाखवतो आणि दुसरे गोड बोलतो. हे त्याचेच काम आहे, त्यांनी बोलून दाखवलं होतं 307 करायला लावेन, म्हणून भाजप संपतंय, असा हल्लाही जरांगे पाटलांनी नाव न घेता फडणवीसांवर केला. तसेच गोरगरीबाच्या पोराला मारं देतो आणि स्वत: ला उच्च नेता म्हणतो, आता तुला कळेल तु उच्च आहे की मतदानाची चिठ्ठ्या वाटण्याच्या लायकीचा अशी टीका देखील जरांगे पाटलांनी केली.

हे ही वाचा : ‘स्वाती’ बनली ‘शिवाय’… वाढवल्या दाढी-मिशा; लग्नासाठी घरचे शोधताहेत मुलगी!

दरम्यान आज जर अधिवेशनाची घोषणा केली नाही आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची घोषणा झाली नाही. सरसरट कुणबी प्रमाणपत्र नाही दिली तर संध्याकाळपासून पाणी सोडणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. त्याचसोबत आमच्याकडून उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. शांततेत आंदोलन सुरु राहतील. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय उठणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT