Milind Deora : 27व्या वर्षी खासदार, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये मंत्री; कोण आहेत देवरा?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

milind deora resigns from congress party political career in congress eknath shinde south mumbai constituncy
milind deora resigns from congress party political career in congress eknath shinde south mumbai constituncy
social share
google news

Milind Deora Resigns From Congress Party : ‘काँग्रेसशी माझ्या कुटुंबियांचे 55 वर्षांपासूनचे असलेले संबंध आज मी संपवत आहे. इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार’ असे म्हणत मिलिंद देवरा यांनी रविवारी सकाळी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता मिलिंद देवरा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आता काँग्रेसची साथ सोडणारे मिलिंद देवरा कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (milind deora resigns from congress party political career in congress eknath shinde south mumbai constituncy)

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील मुरली देवरा हे ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मिलिंद देवरा हे वडिलांप्रमाणे काँग्रेस पक्षात सक्रिय होते. दक्षिण मुंबई या व्हीआयपीसह श्रमिक वर्गाचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले आहे. ते टेक्नोसेव्ही आणि धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जातात.

हे ही वाचा : ठाकरेंचे आठ आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा

मिलिंद देवरा उच्चशिक्षित राजकीय नेते आहेत. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत. 9 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांनी चित्रपट निर्माता मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा शेट्टी हिच्याशी लग्न केले. त्यांची पत्नी वॉक वॉटर मीडिया या चित्रपट निर्माता कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दक्षिण मुंबई बाले किल्ला

मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधले मोठं नाव आहे. दक्षिण मुंबईतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दक्षिण मुंबई ही जागा त्यांचे वडील मुरली देवरा यांचा बालेकिल्ला मानली जाते. मुरली देवरा यांनी 1984, 1996 आणि 1998 मध्ये या जागेवरून निवडणूक जिंकली होती. मुरली देवरा यांच्या निधनानंतर या जागेवरून मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवायला सुरुवात केली होती.

वयाच्या 27 व्या वर्षी खासदारकी लढवली

वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले होते. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरूद्ध 10 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मिलिंद देवरा काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) पहिल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य बनले. 2006 मध्ये ते शहरी विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य झाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?

2009 च्या लोकसभा निवडणुकीतही मिलिंद देवरा या जागेवरून विजयी झाले होते. जुलै 2011 मध्ये, मिलिंद देवरा यूपीए 2 मध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री बनले. नंतर 2012 मध्ये त्यांच्याकडे शिपिंग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. देशात यावेळी मनमोहन सिंगांचे सरकार होेते.

ADVERTISEMENT

अरविंद सावंतांकडून दोनदा पराभव

मिलिंद देवरा यांचा 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा निवडणूकीत पराभव झाला होता. या दोन्ही वेळेस त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मात दिली होती. अरविंद सावंत हे तेच नेत आहेत, ज्यांनी पुन्हा एकदा दक्षिण मुंबई मतदार संघावर दावा ठोकला आहे. तर मिलिंद देवरा देखील याच जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेलाच सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आता मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT