Santosh Bangar : ‘म्हणून’ प्राचार्यांना केली मारहाण; काय आहेत आरोप?
MLA Santosh Bangar slapped to principal : हिंगोली : येथील तंत्रनिकेतन कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केल्याने बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) पुन्हा वादात सापडले आहेत. मारहाण करतानाचा त्यांचा व्हीडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांकडून आमदार बांगर यांच्यावर कारवाईचीही मागणी होऊ लागली आहे. अशातच या मारहाण […]
ADVERTISEMENT

MLA Santosh Bangar slapped to principal :
हिंगोली : येथील तंत्रनिकेतन कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केल्याने बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) पुन्हा वादात सापडले आहेत. मारहाण करतानाचा त्यांचा व्हीडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांकडून आमदार बांगर यांच्यावर कारवाईचीही मागणी होऊ लागली आहे. अशातच या मारहाण प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.(MLA Santosh Bangar slapped to principal video Viral)
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर महाविद्यालयातील शिक्षिकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. “प्राचार्य आमच्यासोबत बोलताना अश्लिल भाषेचा वापर करतात, कार्यालयीन वेळेशिवाय बोलावतात” अशी तक्रार महाविद्यालयाच्या शिक्षिकांनी आमदार बांगर यांच्याकडे केली होती. त्यानंतरच आमदार बांगर यांनी प्राचार्यांच्या दालनात जाऊन त्यांना मारहाण केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. दरम्यान, या संदर्भात प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी ही घटना १८ जानेवारीला घडल्याचं सांगत यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. सोबतच त्यांच्यावर होत असलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
Video : संतोष बांगरांना मतदारसंघात रोखलं; संतापात गावकऱ्याला श्रीमुखात भडकावली!