MNS: "तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही"

MNS aurangabad sabha: 'तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही. ज्या भावाने तुम्हाला महाबळेश्वरमध्ये भरलेलं ताट दिलं. त्या भावाची मर्जी तुम्ही राखली नाही.' अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.
MNS: "तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही"
mns leader prakash mahajan criticized to cm uddhav thackeray raj thackeray aurangabad sabha

औरंगाबाद: मनसेच्या औरंगाबादमधील सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. खास मराठवाड्यातील शैलीत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

'तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही. ज्या भावाने तुम्हाला महाबळेश्वरमध्ये भरलेलं ताट दिलं आणि तुला नेता हो म्हटलं.. त्या भावाची मर्जी सुद्धा तुम्ही राखली नाही. एवढ्या कोत्या मनाचे तुम्ही आहात.' असं म्हणत प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

'हनुमान चालीसा म्हणायला दोन नवरा-बायको येणार म्हणून आमचे मुख्यमंत्री पळून गेले. अरे वडिलोपार्जित घराचं रक्षण कोणी करायचं? इथे एक म्हातारी आणून बसवली. अरे तुमच्याने रक्षण होणार नाही हे बाळासाहेबांनी तेव्हाच कळालं होतं. तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही.'

प्रकाश महाजन, मनसे नेते
प्रकाश महाजन, मनसे नेते

'ज्या भावाने तुम्हाला महाबळेश्वरमध्ये भरलेलं ताट दिलं आणि तुला नेता हो म्हटलं त्या भावाची मर्जी सुद्धा तुम्ही राखली नाही. एवढ्या कोत्या मनाचे तुम्ही आहात. खरं म्हणजे राज साहेबांवर टीका करण्यात लोकं पुढं आहेत.'

'मी सांगतो हा भुजबळ माझापेक्षा पांढरा झाला. तरी साहेबावर टीका करतो. आमचे मुंब्य्राचे इशरत जहाँचे भाऊ तेही हनुमान मंदिरात. ते पुरोगामी. म्हणतात हनुमान चालीसा शिकेन तर एका मौलवीकडून शिकेन. अरे तुमच्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी तुम्ही माझ्या नेत्यावर टीका कराल तर याद राखा कुणीही इथून पुढे माझ्या नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर येणाऱ्या मनसेच्या सभेत मी तुमचा शिमगा केल्याशिवाय राहणार नाही.'

'राज ठाकरेंच्या तलवारीला हात घालण्याअगोदर तुम्हाला प्रकाश महाजन नावाचं म्यान तुम्हाला दूर करावं लागेल. राज ठाकरे यांनी भोंग्याविषयी भूमिका घेतली. ते काही चूक नाही. त्यांनी सांगितलं आहे की, हा सामाजिक विषय आहे. सामाजिक शिवाय हा धार्मिक सुद्धा विषय आहे.'

mns leader prakash mahajan criticized to cm uddhav thackeray raj thackeray aurangabad sabha
'सभेच्या दिवशी आम्ही कोणीही साहेबांच्या...', शर्मिला ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंविषयी 'हा' किस्सा

'जी अजान होते त्या अजानचा नेमका अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की, त्या अल्लाहशिवाय कुणी श्रेष्ठ नाही. म्हणून अल्लाहची प्रार्थना करा. आम्ही का ऐकायची ती प्रार्थना.. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा.' असं म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीच पण यावेळी अजानबाबत देखील त्यांनी थेट आक्षेप देखील घेतला आहे.

Related Stories

No stories found.