'शिंदेंमध्ये शिवसेना फोडण्याची ताकदच नव्हती, शाहा आता त्यांना नष्ट करतील' - Mumbai Tak - mp sanjay raut shiv sena ubt bjp amit shah party split eknath shinde maharashtra politics - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘शिंदेंमध्ये शिवसेना फोडण्याची ताकदच नव्हती, शाहा आता त्यांना नष्ट करतील’

मुंबई Tak चावडीवर संजय राऊतांनी मोठा दावा केला होता की, शिवसेना पक्ष अमित शाहांनी फोडला. याबाबत बोलताना आज संजय राऊत म्हणाले तेच अमित शाह आणि भाजप हे आता शिंदे गटाला नष्ट करतील.
Updated At: Jun 10, 2023 16:18 PM
mp sanjay raut shiv sena ubt bjp amit shah party split eknath shinde maharashtra politics

Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) बोलताना काल (9 जून) गौप्यस्फोट केला होता. शिवसेना ही शिंदेंनी नाही तर अमित शाह (Amit Shah) यांनी फोडली. याचबाबत आज (10 जून) पुन्हा एकदा संजय राऊतांनी भाजप आणि अमित शाहांवर तुफान टीका केली. शिवसेना फोडण्याऐवढी ताकद एकनाथ शिंदेंमध्ये नव्हती. तपास यंत्रणा, दबाव आणून गृहमंत्री अमित शाहांनी शिवसेना पक्ष फोडला असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. (sanjay raut shiv sena ubt bjp amit shah party split eknath shinde maharashtra politics)

संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका

‘शिवसेनेसारखा पक्ष फोडणं.. आणि शिवसेना पक्ष फोडून महाराष्ट्र कमजोर करणं.. मुंबईवर शिवसेनेची आणि पर्यायाने मराठी माणसाची असलेली पकड ही ढिली करणं हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपचं स्वप्नं होतं आणि आहे.. ते करायचं असेल तर आधी शिवसेना फोडली पाहिजे. शिवसेना अशी फुटू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि 5-6 लोकांचा गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद 5-6 आमदारांच्या पुढे नसावी. त्यामुळे जे चित्र नंतर निर्माण झालं ते चित्र निर्माण करण्यात भाजपचं दिल्लीचं नेतृत्व, गृह मंत्रालय.. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून निर्माण झालेला दबाव.. यामुळे हा पक्ष फोडण्यात आला. नाही तर इतक्या मोठ्या संख्येने आमदार गेले.. त्यातील 12-12 आमदारांवर तर खटलेच चालू होते.’

‘अनेक खासदारांवर विविध प्रकारचे खटले चालू होते. या सगळ्यांचा वापर करून अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला. कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करणं.. आपण पाहा.. वारंवार मुंबईवर ताबा घेऊ, मुंबईचा ताबा घेऊ.. सुरू झालंय. मुंबईचा ताबा घेण्यासाठी, मराठी माणसाचं वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर.. धमक्या, पैसा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं राजकारण आहे. पण ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे मी वारंवार सांगत राहिलोय.’

हे ही वाचा >> अटलजींचा फोन, शिवसेनेचे 40-50 खासदार; संजय राऊतांनी सांगितला 1992 चा किस्सा

‘बघा त्यानंतर ज्या घटना घडत गेल्या.. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर जायला लागली. उद्योग बाहेर लागले.. महाराष्ट्राचा आवाज दिल्ली आणि सर्वत्र दाबण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं गेल्या वर्षभरात झालं. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा ईडीच्या माध्यमातूनच दबाव आला. हे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासमोर शिंदे कसे रडले हे मलाही माहिती आहे. आम्ही अनेकदा चर्चा केली.. आमचं म्हणणं होतं की, आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपलं मन खंबीर ठेवलं पाहिजे. हे ही दिवस निघून जातील.. घाबरून चालणार नाही. पण हे लोकं घाबरले.. आता मोठा आव आणतायेत.. डरकाळ्या फोडतायेत.. पण त्या पोकळ गर्जना आहेत. भविष्यात भाजप यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. ती सुरुवात झाली आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष किंवा संघटना राज्यात नकोय.’

‘आता शिंदे गुलामीचं नातं निभावतायेत…’

‘2014 साली भाजपने युती तोडली.. आम्ही नाही युती तोडली. 2014 साली युती शिवसेनेने तोडली नसून भाजपने तोडली हे स्वत: एकनाथ खडसेंनी जाहीर केलं आहे. तेव्हा स्वत: खडसे त्या पक्षात होते.’

हे ही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’

‘आता त्यांचं आमचं काही नातं नाही.. तो एक वेगळा गट बनला आहे. ते भाजपसोबत आहेत. आपल्या गुलामीचं नातं निभावत आहेत. 25 वर्ष आमच्यासोबत भाजपची युती होती. नेहमी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेसोबत संघर्ष करायचे जागांसाठी. शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी देखील आमच्याविरोधात बंडखोरी करायचे. आमच्या जागा कमी करायचे. तरीही 25 वर्ष आम्ही नातं निभावलं.’

श्रीकांत शिंदेवर बोलताना राऊत म्हणाले, आता त्यांना समजेल!

‘आता त्यांना निभावू द्या.. आता त्यांना माहीत पडेल की, शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती आणि आम्ही भाजपसोबत का नातं तोडलं. मुद्दा कल्याण मतदारसंघाचा.. तुम्हाला माहिती असेल.. आनंद दिघे हे ज्या जिल्ह्याचे प्रमुख होते आणि बाळासाहेब.. त्यावेळी कल्याणची जागा आम्ही खेचून घेतली होती. हा आमचा गड आहे आम्ही इथून लढू.’

‘पूर्वी राम कापसे इथून लढायचे भाजपचे.. पण शिवसेनेने ती जागा घेतली आणि कायम तिथून जिंकत आलो. पण आता मुख्यमंत्र्यांचे पुत्र हे तिथून खासदार आहेत. तरीही भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय की, तुम्हाला जागा मिळणार नाही. आता त्या दोघांमध्ये जे काही असेल ते पाहून घेतील. पण प्रत्येक जागेवर असंच होणार आहे.’ असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंवर टीकेची झोड उठवली.

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात