‘खारघर दुर्घटना दाबण्यासाठी…,’सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

MP Supriya sule criticize eknath shinde
MP Supriya sule criticize eknath shinde
social share
google news

MP Supriya sule criticize eknath shinde : नवी मुंबईतील खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award Event) सोहळ्यादरम्यान, तब्बल 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता या घटनेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खारघर दुर्घटना दाबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बदनामीचं षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर केला आहे.सुप्रिया सुळे (Supriya Sule)  राष्ट्रवादीच्या युवा मंथन कार्यक्रमात बोलत होत्या. (mp supriya sule criticize eknath shinde devendra fadnavis on kharghar incident)

खारघर घटना ही अत्यंत दुदैवी घटना घडली. खारघरची घटना दाबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बदनामीचं षडयंत्र रचण्यात आलं. यासाठीच आपल्या पक्ष फुटीच्या बातम्या देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. आपलीच बदनामी या 10 दिवसात कशी झाली? या बातम्या कुठून आल्या, याचे सूत्र कोण आहेत याबाबत कोणालाच माहिती नाही. हे सूत्र नेमके कोण आहेत यावर आपलं लक्ष असलं पाहिजे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच त्यांना जर कोणाची भिती आहे, तर ती राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाची आहे, हे सत्य या राज्याचं नाही देशाचे असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : ‘आता भाकरी फिरवायची वेळ…’, शरद पवारांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

नवाब मलिक यांचं कौतुक

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी नवाब मलिकांचे (Nawab Malik) कौतुक देखील केले आहे. नवाब भाई मुंबईचे रॉकस्टार आहेत.मला दिल्लीत पण लोकं विचारायचे की ते आज कुठला बॉम्ब फोडणार? त्यांच्या पत्रकार परिषदा देशभर गाजल्या. काय यंत्रणा होती काय माहिती, त्यांनी केंद्रीय एजेंसीजना पण सळो की पळो करून सोडले होते. पोलिसांच्या यंत्रणेला जितकी खबर नसायची, तितकी खबर त्यांच्याकडे असायची.कुठुन कुठुन माहिती काढायचे. पण त्यांनी बऱ्याच लोकांचा करेक्ट कार्यक्रम केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतून फिल्म सिटी जाऊ देणार नाही

मुंबईची फिल्म सिटी फक्त ग्लॅमर नाही, तर लाखो नाही तर करोडो नोकऱ्या मिळतात.आणि याच फिल्म सिटीला हलवण्याच कट कारस्थान रचलं गेलं. पण या राज्यातून फिल्म सिटी आम्ही हलवू देणार नाही,असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. जे महाराष्ट्राच आहे ते महाराष्ट्रातच राहणार आणि जिथे जिथे संघर्ष करायची वेळ येईल तिकडे तिकडे राष्ट्रवादीने पुर्ण ताकदीने करेल,असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : भावी मुख्यमंत्री ‘अजित पवार’ : महाराष्ट्रात लागलेल्या होर्डिंग्जचा अर्थ काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT