Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
Nawab Malik Latest Update in Marathi : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले. मलिक यांनी थेट अजित पवार गटाच्या प्रतोदांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT

Nawab Malik Maharashtra Assembly Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून माजी मंत्री नवाब मलिक कोणत्या गटात असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. यावर नवाब मलिक यांनीही मी खऱ्या राष्ट्रवादीसोबत असल्याचे सांगत संभ्रम कायम ठेवला होता. पण, आता नवाब मलिक नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ते कोणत्या बाकावर बसणार, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मलिक यांना अजित पवारांनी कॉल केला होता. त्याचबरोबर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेल्याने ते महायुतीच्या वाटेवर असल्याची सांगितले जात आहे.
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते अलिप्त असल्याचे दिसत होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाला हजर झाल्याने मलिक सक्रिय झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मलिक अजित पवारांबरोबर जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अजित पवारांचा मलिकांना फोन
नवाब मलिकांबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “तुम्हाला काय करायचं आहे? ते आमदार आहेत. स्वतःचा निर्णय घ्यायला ते खंबीर आहेत. सभागृहात कुणी कुठे बसायचं या संदर्भातील अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घटना घडल्या, ते तुम्हाला माहितीये. आज ते आलेत. माझा त्याच्याशी फोन झाला. मी त्यांना नागपुरात स्वागत म्हणून कॉल केला होता.”