Exclusive: अमोल कोल्हे पवारांकडे परतले, सांगितली राजभवनातील Inside Story

साहिल जोशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे आता शरद पवारांकडे परतले आहेत. त्यानंतर मुंबई Tak सोबत Exclusive बातचीत करताना अमोल कोल्हे यांनी राजभवनात नेमकं काय घडलं याची Inside Story सांगितली

ADVERTISEMENT

NCP MP Amol Kolhe has now returned to Sharad Pawar. After that, in an exclusive interview with Mumbai Tak, Amol Kolhe told the inside story of what actually happened in the Raj Bhavan
NCP MP Amol Kolhe has now returned to Sharad Pawar. After that, in an exclusive interview with Mumbai Tak, Amol Kolhe told the inside story of what actually happened in the Raj Bhavan
social share
google news

Amol Kolhe NCP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोच त्यांना पहिला हादरा बसला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे काल राजभवनात अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. एवढंच नव्हे तर ते राजभवनात सुधीर मुनगंटीवार यांना भेटले त्यावेळी त्यांच्या पाया देखील पडले होते. असं असताना अशी जोरदार चर्चा सुरू होती की, अमोल कोल्हे हे अजित पवारांच्या सोबत गेले आहेत. मात्र, अजित पवारांच्या शपथविधीला 24 तासही उलटत नाही तोच कोल्हेंनी आपली बाजू बदलली आहे. ‘आपण शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचे त्यांनी यावेली सांगितले आहे.’ त्यामुळे कोल्हे यांची बाजू बदलणं हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (ncp mp amol kolhe returned to sharad pawar camp exclusive interview mumbai tak inside story what happened raj bhavan ajit pawar swearing ceremony)

अमोल कोल्हे यांचे ट्विट

राष्ट्रवादीचे शिरूरचे लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘जेव्हा मेंदू आणि मनामध्ये द्वंद असतं तेव्हा मनाचे ऐका. कदाचित मेंदू कधी-कधी नैतिकता विसरते… पण हृदय कधीच नैतिकता विसरत नाही.’ हे ट्विट त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना टॅग केले आहे.

दरम्यान, यानंतर अमोल कोल्हे यांनी मुंबई Tak सोबत Exclusive बातचीत केली. पाहा त्यावेळी अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

    follow whatsapp