NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू असतानाच शरद पवारांना झटका बसला आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

Mohammed Faizal disqualified as lok sabha member : राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाई सुरू झाली आहे. पण, निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाली आहे. फैजल हे लक्षद्वीपचे खासदार होते. वर्षभरात दोनदा खासदार अपात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी (४ ऑक्टोबर) लोकसभा सचिवालयाने सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली.
यापूर्वी फैजल यांची शिक्षा रद्द करणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाने यावेळी तसे करण्यास नकार दिला आहे. फैजलला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी केरळ हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली आहे.
लोकसभा सचिवालयाने बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ‘केरळ उच्च न्यायालयाच्या ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानुसार, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. हे त्यांना दोषी ठरवण्यात आल्याच्या 11 जानेवारी 2023 तारखेपासून लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहेत. फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे.
Mohammed faizal disqualified : यापूर्वी २५ जानेवारीला करण्यात आले होते निलंबित
यापूर्वी फैजल यांना 25 जानेवारी 2023 रोजी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने फैजल आणि इतर तिघांना पी सलीहचा हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते आणि चौघांना 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.