Garware Club Election: शरद पवारांना धक्का.. ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp supremo sharad pawars faction has been badly defeated in the elections of garware club located at wankhede stadium mumbai
ncp supremo sharad pawars faction has been badly defeated in the elections of garware club located at wankhede stadium mumbai
social share
google news

Sharad Pawar Garware Club Election: अभिजीत करंडे, मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या (Garware Club) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. या क्लबच्या निवडणुकीसाठी डायनामिक ग्रुप आणि शरद पवारांचा डेव्हलपमेंट ग्रुप यांच्या लढाई झाली. ज्यामध्ये डायनामिक ग्रुपने एकहाती बाजी मारली. त्यामुळे हा शरद पवारांसाठी मोठा मानला जात आहे. त्याशिवाय भाजपचे (BJP) नेते राज पुरोहित (Raj Purohit) यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते याआधी उपाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांच्या जागी उपाध्यक्ष म्हणून डायनामिक ग्रुपचे सायरस गोरीमार हे निवडून आले आहेत. (ncp supremo sharad pawars faction has been badly defeated in the elections of garware club located at wankhede stadium mumbai)

गरवारे क्लबचे एकूण 13 हजार सदस्य आहेत. ज्यापैकी 4 हजार सदस्यांनी निवडणुकीत मतदान केलं. ज्यामध्ये मतदारांनी शरद पवार यांच्या डेव्हलपमेंट ग्रुपला नाकारत डायनामिक ग्रुपला पसंती दिली. आतापर्यंत क्रिकेट आणि त्याच्याशी संबंधित अनेक संस्था, क्लब यांच्यावर शरद पवार किंवा त्यांच्या गटाचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र, आता त्यांना येथील वर्चस्व देखील गमवावं लागत असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा>> Sharad Pawar: ‘मोदींचं ते वक्तव्य क्लेशदायक’, पवारांची घणाघाती टीका

गरवारे क्लबची निवडणूक ही उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि 10 समिती सदस्यांसाठी पार पडली. या निवडणुकीत शरद पवार आणि भाजप नेते राज पुरोहित हे एकाच गटात होते. पण या निवडणुकीत शरद पवारांसह संपूर्ण डेव्हलपमेंट गटाला पराभवाचा सामना करावा लागला. आता गरवारे क्लबच्या उपाध्यक्ष पदी डायनामिक गटाचे सायरस गोरीमार आणि कोषाध्यक्ष म्हणून मनिष अजमेरा यांची निवड झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या गटाचा पराभव

गरवारे क्लबच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक ही 23 ते 26 सप्टेंबरमध्ये पार पडली. पहिल्या 3 दिवसांच्या रिमोट ई-व्होटिंगनंतर आज (26 सप्टेंबर) गरवारे क्लबमध्ये सकाळी 9 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली होती. ‘शरद पवार डेव्हलपमेंट ग्रुप’ नेहमीप्रमाणे या वेळीही विजयासाठी प्रयत्नशील होती. शरद पवार डेव्हलपमेंट गटाचे नेतृत्व हे उपाध्यक्ष राज के पुरोहित यांच्याकडे होतं. पण डायनामिक गटाने अत्यंत अनपेक्षितरित्या शरद पवारांच्या गटावर मात केली.

हे ही वाचा>> MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?

भाजप नेते राज पुरोहित हे तीस वर्षांपासून गरवारे क्लबशी संलग्न आहेत. लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील यशस्वी मंत्री राज पुरोहित यांच्याकडे संघटना चालवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे तेच पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मतदारांनी त्यांना सपशेल नाकारलं आहे.

ADVERTISEMENT

22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता गरवारे क्लबच्या बँक्वेट हॉलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत एक सभाही झाली होती. ज्यामध्ये उपाध्यक्ष राज के पुरोहित यांनी सर्वांना गरवारे क्लबबद्दल माहिती दिली होती. तसेच गेल्या पाच वर्षांत व्यवस्थापकीय समितीने जी कामे केली होती त्याचीही माहिती दिली होती. मात्र, मतदारांनी डेव्हलपमेंट गटाला नाकारून आता क्लबचा कारभार हा डायनामिक गटाकडे सोपवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT