Uddhav Thackeray :”एकीकडे गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू, दुसरीकडे निष्ठावंत शिवसैनिकांचे अश्रू…”

मुंबई तक

शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. शिवसेना भवन या ठिकाणी हा संवाद त्यांनी साधला. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी उठाव केला. त्यानंतर काय काय घडामोडी घडल्या ते महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेना पक्ष अजून फुटण्यापासून वाचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. आज उद्धव ठाकरे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. शिवसेना भवन या ठिकाणी हा संवाद त्यांनी साधला. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी उठाव केला. त्यानंतर काय काय घडामोडी घडल्या ते महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेना पक्ष अजून फुटण्यापासून वाचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. आज उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?

माझ्या शिवसैनिक भगिनींनो

काल शंभर टक्के बांधव होते, आज समोर शंभर टक्के भगिनी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि मोकळेपणाने सांगतो की शक्ती मिळाल्याचा अनुभव आला आहे. तुम्ही सर्वजणी अमाप कष्ट करत आहात. तुमच्या भावना बोलता आहात, बहुतेक जणींच्या मला डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मी असा उभा आहे, एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू…यामधून मला मार्ग काढायचा आहे. पण मार्ग तर नक्की काढणार.

मला खंत एका गोष्टीची आहे, 25-30 वर्ष सोबत राहिलो ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले. 25-30 वर्ष ज्यांच्या विरुद्ध लढलो ते काँग्रेस, राष्ट्रवादी…आपल्याला सांगत होते की काँग्रेस…शरद पवार…त्यांच्यावर शिक्काचं आहे. पण ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत होते ते अजून सोबत आहेत, पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp