सावरकरांवरून राजकारण तापलं; शिंदे-फडणवीसांनी बदलली डीपी, गौरव यात्राही काढणार
Savarkar Gaurav Yatra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना-भाजप युतीचे अन्य नेते विनायक दामोदर सावरकरांच्या समर्थनार्थ ‘गौरव यात्रे’पूर्वी मंगळवारी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो डीपीवर (डिस्प्ले पिक्चर्स) ठेवले. सर्व नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले.(Politics heated up on Savarkar; Shinde-Fadnavis changed DP, Gaurav Yatra will also be held) […]
ADVERTISEMENT

Savarkar Gaurav Yatra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना-भाजप युतीचे अन्य नेते विनायक दामोदर सावरकरांच्या समर्थनार्थ ‘गौरव यात्रे’पूर्वी मंगळवारी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो डीपीवर (डिस्प्ले पिक्चर्स) ठेवले. सर्व नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले.(Politics heated up on Savarkar; Shinde-Fadnavis changed DP, Gaurav Yatra will also be held)
Savarkar row : सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये
30 मार्चपासून गौरव यात्रा
भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सावरकरांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर (सावरकर) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी 30 मार्चपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सावरकरांचे छायाचित्र टाकण्यासोबतच नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले.
सावरकरांसारख्या वीरांनी स्वातंत्र्य मिळवून दिले : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी त्यांचा ट्विटरचा डीपी बदलून सावरकरांचा फोटो ठेवला. यानंतर 28 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांसारख्या वीरांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले, राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याचा मी निषेध करतो. सावरकरांच्या स्मरणार्थ आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत.










