Thackeray बंधू एकत्र.. रश्मी वहिनींच्या राज ठाकरेंसोबत रंगल्या गप्पा; सेल्फी घेणारी ‘ती’ कोण?
Thackeray Brother: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय वैरी असले तरी कौटुंबिक पातळीवर त्यांचे ऋणानुबंध हे कायम आहेत. हेच मुंबईतील एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. वाचा यामागची Inside Story
ADVERTISEMENT

Raj Thackeray- Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. एवढंच नव्हे तर यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या वहिनी रश्मी ठाकरे यांच्यासोबत गप्पाही मारल्या. तसंच दोन्ही ठाकरे बंधूंमध्येही संवाद झाल्याचं समजतं आहे.. आणि हे सगळं घडलं तेही कॅमेऱ्यासमोर.. या सगळ्यात एका तरुणीने जो सेल्फी घेतला त्याचीही जोरदार चर्चा आता रंगली आहे. (raj thackeray and uddhav thackeray came together rashmi thackeray chat with raj urvashi thackeray took a selfie)
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. त्याचवेळी राज आणि रश्मी ठाकरे यांच्यात गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा>> ‘मुंबईची लूट अहमदाबाद, दिल्लीच्या आदेशावरून’, आदित्य ठाकरे प्रचंड चिडले!
राज ठाकरे यांची बहीण जयंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू हे एकत्र आले होते. दादरमधील हिंदू कॉलनी येथील एका सभागृहात हा समारंभ पार पडला. या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलेले पाहायला मिळाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये यावेळी बराच संवाद देखील झालेला पाहायला मिळाला. पण सध्या राज्यात ज्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतायेत अशावेळी ठाकेर बंधूंच्या या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी रश्मी ठाकरे देखील या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्या देखील राज ठाकरेंसोबत अगदी हास्यविनोद करताना दिसल्या.










