Raj Thackeray : सभेपूर्वी शंखनाद! राज ठाकरे औरंगाबादला जाताना काय काय घडलं?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादेत सभा होत आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज (३० एप्रिल) औरंगाबादला रवाना झाले असून, या प्रवासादरम्यान, राज ठाकरेंनी दोन ठिकाणी हजेरी लावली. राज पुणे मार्गे औरंगाबादला रवाना झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या (१ मे) सायंकाळी सभा होत आहे. या सभेची जय्यत […]
ADVERTISEMENT

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादेत सभा होत आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज (३० एप्रिल) औरंगाबादला रवाना झाले असून, या प्रवासादरम्यान, राज ठाकरेंनी दोन ठिकाणी हजेरी लावली. राज पुणे मार्गे औरंगाबादला रवाना झाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या (१ मे) सायंकाळी सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी मनसेकडून सुरू असून, राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.
या सभेसाठी राज ठाकरे आजच रवाना झाले. सभेला जाताना राज ठाकरे पुण्यात काही काळ थांबले. राज ठाकरे यांची औरंगाबादेतील सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुण्यातील शंभर पुरोहितांकडून शंखनाद करत स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्व करत राज यांना आशीर्वाद देण्यात आला.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन, पहा फोटो