Rajyasabha Election : संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली याचं वाईट वाटतं-पंकजा मुंडे
सर्वांनी मिळून संभाजीराजेंचा सन्मान करायला हवा होता. मात्र सगळ्या पक्षांनी आपला आपला निर्णय घेतला. संभाजी राजेंना यामुळे माघार घ्यावी लागली. याचं मला वाईट वाटतं आहे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘मुख्यमंत्र्यांकडून […]
ADVERTISEMENT

सर्वांनी मिळून संभाजीराजेंचा सन्मान करायला हवा होता. मात्र सगळ्या पक्षांनी आपला आपला निर्णय घेतला. संभाजी राजेंना यामुळे माघार घ्यावी लागली. याचं मला वाईट वाटतं आहे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती’; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार
ओबीसी आरक्षणाविषयी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात सुटला नाही त्याला महाराष्ट्रातले अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित मंत्रालयाने व्यवस्थित डेटा कोर्टात दिला नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारने हे स्वीकारलं आहे की मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रात ओबीसींचा डेटा तयार केला जाईल. राज्य सरकार जून महिन्यात हा डेटा सादर करणार आहे. हा डेटा आधी सादर केला असता तर निश्चितच आरक्षण मिळालं असतं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.