राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेकडून खबरदारी...
राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची बेरीज सुरु असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता अपक्ष आमदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
राज्यसभेसाठी २४ वर्षानंतर मतदान; १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार कसा पडला होता?

राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून, मतं फुटू नये म्हणून राजकीय पक्षांकडून आमदारांना एका ठिकाणी ठेवण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला चार दिवस बाकी असताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

आज (६ जून) सायंकाळी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना आमदार, समर्थक लहान पक्ष, अपक्ष आमदार उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
राज्यसभा निवडणूक: 'वर्षा'वरच्या बैठकीतील Inside स्टोरी, मुख्यमंत्र्यांनी आखली रणनिती!

शिवसेना आमदारांना ट्रायडंट हॉटेलमधून दुसरीकडे हलवणार

राज्यसभा निवडणुकीमुळे दगाफटका होऊ नये, मतं फुटू नये म्हणून शिवसेनेकडून सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ८ जून ते १० जूनपर्यंत शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये मुक्कामाला असणार होते.

दरम्यान, भाजपनंही आपल्या आमदारांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्येच केली आहे. भाजप आमदारही याच हॉटेलमध्ये राहणार असल्यानं शिवसेनेनं आता आमदारांची व्यवस्था दुसऱ्या हॉटेलमध्ये करणार आहे. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!

सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे प्रयत्न

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, सहाव्या जागेवरूनच राज्यसभेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. शिवसेनेनं संजय राऊत यांच्याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिलीये. तर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिलीये.

सहाव्या जागेवरून कोण निवडून येणार याचीच सध्या चर्चा सुरू असून, भाजपने धनंजय महाडिक यांच्या विजयाचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही संजय पवार यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळेच शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी लागणाऱ्या अधिकच्या मतांसाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न होत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in