Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?

Rajya sabha Election 2022 : भाजपने निष्ठावंतांना डावलल्याची टीका होत असून, राऊतांनी यावर भाष्य केलंय...
Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल चर्चा होतेय. त्यातच आता भाजपने निष्ठावंतांना डावलल्याचा सूरही उमटू लागला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील नेतृत्व आणि राज्यसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं.

Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?
राज्यसभा निवडणूक 2022 : महाविकास आघाडी की भाजप... कुणाकडे आहे जास्त संख्याबळ?

"सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे की तेच मुख्यमंत्री राहणार. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खुश आहेत," असं राऊत म्हणाले.

"सातवा अर्ज ज्यांनी भरलाय, त्यांना राज्यात घोडेबाजार करायचा आहे, असं दिसतंय. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेव्हढी मतं नाहीत. मतं असती, तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केलं असतं. आधी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं. आता त्यांनी कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिलीये," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?
'मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती'; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार

"मला आश्चर्य वाटतंय की, भाजपचे दोन्ही उमेदवार हे भाजपचे नाहीत. ते बाहेरचे आहेत. भाजपचे जे निष्ठावान आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. जे वर्षानुवर्षांपासून काम करत आहेत. त्यांना डावलण्यात आल्याचं मी वाचलं. जे इतर पक्षातून आलेत आणि ते फक्त शिवसेना व महाविकास आघाडीवर चिखलफेक करतात, त्यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे. हे माझ्या पाहण्यात आलंय," असं म्हणत संजय राऊतांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं.

Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?
संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा

भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत एकाही मुस्लिम नेत्याचं नाव नसल्याचा मुद्दा आता चर्चिला जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले, "भाजप देशाची गोष्ट करतो, पण देशाच्या एकात्मतेविषयी कुणी बोलत असेल, त्यांना ते समजत नाही. हे लोक एका जातीचं आणि धर्माचं राजकारण करणारे आहेत. तो त्यांचा विचार आहे."

"संभाजीनगरची शिवसेनेची सभा रेकॉर्ड ब्रेक असते. उद्धव ठाकरे संभाजीनगरला जातील. या सभेनं वातावरण ढवळून निघेल," असं राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in