यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केले, पुढेही करणार : रोहित पवार
बारामती : माध्यमांमधून काही बातम्या मी ऐकल्या. पण त्या कशा आल्या हे माहित नाही. मला खोलात जावून समजून घ्यावे लागले. पण जे लोक माझ्याशी बोलणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर काय खरं काय खोट हे मी नक्कीच सांगेन. सोबतच मी संचालक होतो हे कोणी सांगितले, त्यांच्याकडे नेमके काय कागदपत्र आहेत ते आधी काय आहेत ते पाहून […]
ADVERTISEMENT

बारामती : माध्यमांमधून काही बातम्या मी ऐकल्या. पण त्या कशा आल्या हे माहित नाही. मला खोलात जावून समजून घ्यावे लागले. पण जे लोक माझ्याशी बोलणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर काय खरं काय खोट हे मी नक्कीच सांगेन. सोबतच मी संचालक होतो हे कोणी सांगितले, त्यांच्याकडे नेमके काय कागदपत्र आहेत ते आधी काय आहेत ते पाहून मी या संदर्भात बोलेन. यापूर्वीही मी अनेकदा अशा केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशांसाठी सहकार्य केले असून यापुढेही करेन, अशा शब्दात ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशी आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहातील सृजन भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार बोलत होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा थेट पवार कुटुंबीयांकडे वळविला आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची प्राथामिक चौकशी करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे.
ईडीचा मोर्चा आमदार रोहित पवारांकडे : ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीचे आदेश
नेमके काय आहे प्रकरण?
आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.