NCP : रोहित पवारांमागे ईडीचा ससेमिरा सुरूच! 12 तासांच्या चौकशीनंतर पुन्हा समन्स

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

rohit pawar summoned by ed again on feb 1 alleged msc bank scam sharad pawar
rohit pawar summoned by ed again on feb 1 alleged msc bank scam sharad pawar
social share
google news

Rohit Pawar Ed Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडीच्या कार्यालयात तब्बल 12 तास चौकशी झाली. या चौकशीनंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) ईडी कार्यालयाबाहेर येऊन ‘महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही’ असे विधान करून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बुधवारची 12 तासांची चौकशी पार पडल्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता 1 तारखेला पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. (rohit pawar summoned by ed again on feb 1 alleged msc bank scam sharad pawar)

बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून रोहित पवारांची 12 तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे केली असून यापुढंही त्यांना सहकार्य केले जाईल असा शब्द रोहित पवारांनी यावेळी दिला. तसेच 1 तारखेलाही देखील पुन्हा बोलवण्यात आले असून त्यावेळीही असच सहकार्य केले जाईल असेही रोहित पवारांनी सांगितले.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘जरांगेना मुंबईत येण्याचा अधिकार नाही’, गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?

अजित पवार गटावर टीका

जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा शरद पवार हे त्याच्यामागे खंबीरपणे उभा असतात, आणि त्याच वेळी ते त्याला संधीही देतात असा विश्वासही त्यांनी शरद पवारांबाबत व्यक्त केला. यावेळी त बारा तास बसले याच्यावरून एक गोष्ट समजून घ्या, ते संधी देतातही अडचणीत येतात तेव्हा त्याच्यामागे पवार साहेब भक्कमपण उभा राहतात. पळणाऱ्या मागे साहेब नसतात तर लढणाऱ्या मागे खंभीरपणे उभा राहतात असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादा काँग्रेसमधून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटावरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला सोडून सत्तेत गेलेल्यांना तुम्ही स्व-हितासाठी सत्तेत गेला असल्याची टीकाही त्यांनी अजित पवार गटावर केली आहे.

हे ही वाचा : Mamata Banerjee : ‘INDIA’ आघाडी फुटली! ममता बॅनर्जींनी सोडली साथ

    follow whatsapp

    ADVERTISEMENT