Supriya Sule : 'आत्मविश्वास गमावलेल्या...', रुपाली चाकणकरांनी ट्विट करत सुप्रियाताईंना डिवचले - Mumbai Tak - rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Supriya Sule : ‘आत्मविश्वास गमावलेल्या…’, रुपाली चाकणकरांनी ट्विट करत सुप्रियाताईंना डिवचले

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. आजच रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यात हे राजकीय युद्ध रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud

Rupali Chakankar : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल संसदेत भाषण करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आरोपावरून त्यांना थेट आव्हानचे दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर (National Congress Party) भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि राज्य सहकाराच्या बॅंकेच्या घोटाळ्याची चौकशी तुम्ही कराच. ती चौकशी करताना मी तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे असं वक्तव्यही त्यांनी संसदेत केलं होतं. त्यांच्या त्या मागणीनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (rupali chakankar tweeted supriya sule lost confidence irrigation scam bank fraud)

शिळ्या कडीला ऊत

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही चौकशी लावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. त्यावर आता रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता तयांच्यावर निशाणा साधला आहे. हे म्हणत असताना त्यांनी हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

हे ही वाचा >> नव्या संसदेत पहिलेच भाषण, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नवीन संकल्प….’

‘हे’ बघून आश्चर्य वाटतं

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी बघून आश्चर्य वाटतं आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये राजकीय युद्ध रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

हे ही वाचा >> ‘…तरीही निवडणूक आयोगाने ‘तो’ निर्णय घेतला’, जयंत पाटलांचं मोठं विधान

उमाळा दाटून येणारी व्यक्ती

रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता अजित पवारांवरून त्यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या अजितदादांचे काही फोटो बघून भावूक झाल्याचे दिसतात. त्या व्हिडीओवरूनच बरं आम्ही कोणाला खरं समजायचं?? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी? असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

डेंग्यूच्या रूग्णांनी ‘या’ गोष्टी खाणं टाळाच! नाहीतर… Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट?