सदा सरवणकरांनी गोळीबार केलाय, गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही; अरविंद सावंतांची भूमिका
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शनिवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. याप्रकरणी दादर पोलिसात ठाकरे गटाच्या 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या घटनेदरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल […]
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शनिवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. याप्रकरणी दादर पोलिसात ठाकरे गटाच्या 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या घटनेदरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका खासदार अरविंद सावंत यांनी घेतली.
सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा
सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. गोळीबार करून आमच्याच लोकांवर गुन्हा दाखल केला. पोलीस देखील त्यांचंच ऐकत आहे. आमच्या लोकांनी त्यांच्या अगोदर तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. तपास न करता थेट 395 सारखा दरोड्याचा कलम लावला. त्यामुळे 395 सारखा कलम त्यातून काढण्यात यावं आणि सदा सरवणकर यांच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका अरविंद सावंत यांनी घेतली.
गोळीबार झालाच नाही : शिंदे गट