शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर, २६ मे रोजी अर्ज करणार दाखल

सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा विक्रम संजय राऊत यांच्या नावावर
शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर, २६ मे रोजी अर्ज करणार दाखल
Shiv Sena leader Sanjay Raut will file his nomination for the Rajya Sabha on May 26 at the Vidhan Bhavan

राज्यसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला आणि सगळ्याच पक्षांची तयारी सुरू झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. शिवसेनेनेही यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेसाठी संजय राऊत २६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा नवा विक्रम संजय राऊत यांच्या नावावर झाला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या राज्यसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेसाठी आवश्यक संख्याबळ महाविकास आघाडी सरकारकडे आहे. अशात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. मात्र पहिल्या जागेवर शिवसेनेने संजय राऊत यांचं नाव निश्चित आहे.

राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावं चर्चेत आहे. चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हे चारही नेते गेल्या लोकसभेत पराभूत झाले आहेत, त्यामुळं एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या सहाही जागा महाराष्ट्र विधानसभेतून असणार आहे. त्यातच संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळ राज्यसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

कशी होते राज्यसभेची निवडणूक, राज्यातल्या आमदारांच्या संख्येवर राज्यसभेची गणितं कशी ठरतात हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

संविधानातील आर्टिकल 83(1) नुसार राज्यसभा स्थायी सभागृह आहे. त्याचं विघटन हे करता येऊ शकत नाही. राज्यसभेचे एकूण सदस्य 245 असतात. ज्यामध्ये 12 खासदार हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. त्यांच्या व्यतिरिक्त उरलेले 233 खासदार निवडणुकीने राज्यसभेवर निवडून जातात.

कोणत्या राज्यातून किती खासदार राज्यसभेवर जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं. अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा-नगर हवेली, दमण, दीव आणि लक्षद्वीपमधून राज्यसभेवर एकही खासदार जात नाही.

राज्यसभेच्या खासदाराचा कार्यकाळ 6 वर्षे असतो आणि दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

उमेदवार भारताचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.

राज्यसभा खासदाराच्या निवडणुकीचं गणित समजून घेण्यासाठी आपण उदाहरण महाराष्ट्राचंच घेऊ.

राज्यसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे आमदार मतदान करू शकत नाही. कारण विधान परिषद प्रत्येक राज्यात नसते. त्यामुळे फक्त विधानसभेचे आमदार राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतात.

महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण आमदार 288 आहेत. आता उदाहरणाखातर आपण समजू राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक लागतेय, तर यामध्ये 1 अॅड करायचा म्हणजे झाले 8. आता एकूण आमदार 288 भागिले 8 करायचे, म्हणजे झाले 36. या 36 मध्ये पुन्हा 1 अॅड करायचा, म्हणजे झाले 37. ज्या उमेदवाराला राज्यसभेवर निवडून जायचं आहे त्याला किमान 37 मतांची गरज आहे.

जेव्हा मतदान होतं तेव्हा या आमदारांना त्यांचं प्राधान्य देता येतं. म्हणजे A B C असे 3 उमेदवार असतील तर पहिलं प्राधान्य C ला दुसरं प्राधान्य A ला आणि तिसरं प्राधान्य B ला असं देता येतं.

राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून यायला किमान 37 मतं तरी गरजेची असतात. आता या उमेदवारांमध्ये कुणालाच 37 मतं मिळाली नाहीत, तर सगळ्यात कमी मतं असलेली व्यक्ती बाद होते. उदाहरणाखातर C ला सगळ्यात कमी मतं मिळाली, तर ती बाद होणार आणि तिच्यासाठी मतदान केलेल्यांनी A आणि B ला जे प्राधान्य दिलं होतं ते पुढे पकडलं जातं. त्यानुसार A आणि B मध्ये ज्याला 37 मतं मिळतील ती व्यक्ती राज्यसभेची खासदार म्हणून निवडली जाते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in