Shreerang barne: “उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं तुम्हाला हवं…”
श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे गेले त्यावेळी त्यांनी आपण शिंदे गटात का गेलो? त्याचं कारण सांगितलं आहे. शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच विमानतळावर जोरदार स्वागत झालं. बारणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर जमले होते. दिल्लीहून पुण्यात पोहोचतात श्रीरंग बारणे यांनी त्यांची […]
ADVERTISEMENT

श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे गेले त्यावेळी त्यांनी आपण शिंदे गटात का गेलो? त्याचं कारण सांगितलं आहे.
शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच विमानतळावर जोरदार स्वागत झालं. बारणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर जमले होते. दिल्लीहून पुण्यात पोहोचतात श्रीरंग बारणे यांनी त्यांची शिंदे गटात जाण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.
श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय म्हटलंय?
महाविकास आघाडीने पार्थ पवारांसाठी मावळ हा मतदारसंघ सोडावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तेव्हा शिवसेना पक्षाच्या एकाही नेत्याने उघडपणे विरोध केला नाही. विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने भविष्यातही आम्ही हा मतदारसंघ कुणाला सोडणार नाही ही भूमिका घेतली नव्हती. ही मोठी खंत आहे. खरं तर भविष्याचा विचार केला असता तर इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायाचा असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही.
उद्धव ठाकरे यांनीच मला सांगितलं हवा तो निर्णय घ्या त्यामुळेच मी शिंदे गटात-श्रीरंग बारणे
२०१४ तसंच २०१९ मधल्या लोकसभा निकालांवरून स्पष्ट झालं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी हे मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यांच्या कानावर ही वारंवार घातली होती. मात्र आता शक्य नाही असं सांगितलं त्यांनी मला तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या असं सांगितलं त्यानंतर मी एकनाथ शिंदे गटात गेलो असं श्रीरंग बारणे यांनी सांगितलं.