Kalaben Delkar: उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का.. ‘हा’ विश्वासू खासदार थेट भाजपमध्ये?
Kalaben Delkar Meets PM Modi: दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण त्या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

Kalaben Delkar BJP: मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (UBT) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ज्यांच्या खासदारकीसाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पंगा घेतला होता. त्याच खासदार आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. दादरा-नगर हवेलीतील शिवसेना (UBT) खासदार कलाबेन डेलकर यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. (shiv sena thackeray group mp kalaben delkar is likely to join the bjp before lok sabha 2024 elections big blow to uddhav thackeray)
कलाबेन मोहन डेलकर या सात वेळचे खासदार असलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. याच कलाबेन डेलकर यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी ही भेट ‘अर्थपूर्ण’ झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता डेलकर कुटुंबीय पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पंतप्रधानांसोबतची भेट ‘अर्थपूर्ण’
दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन मोहन डेलकर यांच्यासह त्यांचा मुलगा अभिनव मोहन डेलकर आणि मुलगी दिविता मोहन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली.
या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदार कलाबेन मोहन डेलकर यांनी दादरा नगर हवेलीच्या जनहिताच्या प्रश्नांची माहिती पंतप्रधानांना दिली.
पंतप्रधानांनी त्यांच्या व्यस्त वेळेत भेटण्यासाठी वेळ दिला आणि राज्यातील सर्व जनहिताच्या प्रश्नांवर मोठ्या आस्थेने चर्चा केली.
या चर्चेदरम्यान समोर आलेल्या सर्व मुद्द्यांची पंतप्रधानांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आणि दादरा नगर हवेलीच्या सर्व विकासाच्या प्रश्नांवर आणि राज्यातील जनतेसोबत आपण सजग असल्याची ग्वाही दिली.
होय… पंतप्रधान आणि खासदारांमधील ही अर्थपूर्ण बैठक राज्याच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. असं म्हणत अभिनव डेलकर यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
मोहन डेलकरांनी मुंबईत केलेली आत्महत्या
मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील सी ग्रीन या हॉटेलमध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार राडा झाला होता. कारण मोहन डेलकर यांनी दीव-दमणचे प्रशासकावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. ज्यावरुन शिवसेनेने याच मुद्द्यावरून भाजपवर तुफान टीका केली होती.










