Shiv Sena: ‘तिकडे प्रचाराला जाता.. लाज नाही वाटत?’, उद्धव ठाकरे CM शिंदेंवर का भडकले?

रोहित गोळे

Uddhav Thackeray: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण तरीही मुख्यमंत्री महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तेलंगणात प्रचारासाठी गेले. अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

shiv sena thackeray vs shinde you go there to election campaign dont you feel ashamed uddhav thackeray venomous attack on cm eknath shinde
shiv sena thackeray vs shinde you go there to election campaign dont you feel ashamed uddhav thackeray venomous attack on cm eknath shinde
social share
google news

Uddhav Thackeray Criticized Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) चे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. ‘एकीकडे राज्यात शेतकऱ्यांची वाताहात झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या राज्याता प्रचाराला जातात.. लाज वाटत नाही?’ अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) निशाणा साधला. ‘मातोश्री’वर बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (shiv sena thackeray vs shinde you go there to election campaign dont you feel ashamed uddhav thackeray venomous attack on cm eknath shinde)

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले…

‘सूरत, गुवाहटी, गोवा हा चोरटेपणाचा जो व्यवहार लोकांना सांगणार का?’

‘जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते आपलं घर सोडून इतरांची घरं धुडाळत आहेत. आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत? माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेले आहेत. तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार? कोणत्या भाषेत बोलणार? काय ते सूरत, गुवाहटी, गोवा हा चोरटेपणाचा जो व्यवहार आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का..’

‘स्वत:चं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही. राज्य असंच वाऱ्यावर आहे. एक फुल दोन हाफ.. दुसरे दोन हाफ कुठे आहेत त्याची काहीच कल्पना नाही. शेवटी या राज्याचा मायबाप कोण आहे?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.

खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्ली वाऱ्या..’

‘साधारण काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की, या काळात अवकाळी पाऊस, गारपीठ होऊ शकते. काय केलं मंत्रिमंडळाने, काय केलं मुख्यमंत्र्यांनी..?’

हे वाचलं का?

    follow whatsapp