‘देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’, उद्धव ठाकरेंनी काढली खपली!
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Politics of Maharashtra: मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) 12 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी काल (19 जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी चौकशीसाठी SIT स्थापन केल्याची घोषणा केलाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. याचवेळी फडणवीसांच्या भाषणातील एका क्लिपवरुन बोलताना देखील देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. (shiv sena ubt udhhav thackeray corona vaccine video pm modi devendra fadnavis bjp leadership pm modi politics of maharashtra)
”देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या जखमेवरची खपली काढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण सत्ता बदलावेळी अचानक भाजपच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंइत्री करण्याचे आदेश दिले. याच मुद्द्याला धरून फडणवीसांचा ‘नावडाबाई’ असा उल्लेख करत ठाकरेंनी त्यांना डिवचलं आहे.
‘फडणवीस म्हणतात.. मोदींनी कोरोनाची लस तयार केली’
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या कल्याणमधील भाषणाची एक क्लिप दाखवली होती. याच मुद्द्यावरुन पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी फडणवीसांना डिवचत म्हटलं की, ते आता दिल्लीश्वरांचे नावडाबाई झालेत.
‘हा एक जो काही भ्रम पसरवला जातोय.. आता काल ती मी एक क्लिप ऐकवली. देवेंद्र फडणवीस असं बोलतील असा मला विश्वास बसत नव्हता. आता ती पण कोणी मॉर्फ केली का… हे त्यांनी शोधावं.’