NCP: ‘साहेबांचं वय काय बघता, डोकं तेच आहे..’, रोहित पवारांकडून अजितदादांना चॅलेंज
शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी थेट चॅलेंज दिलं आहे. पाहा मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड करुन अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे पक्षात फूट पडली आहे. एकीकडे 83 वर्षांचे शरद पवार (Sharad Pawar) आणि दुसरीकडे अजित पवार हे आता आमनेसामने ठाकले आहेत. अजित पवारांच्या कृतीने फक्त पक्षच नाही फुटला तर त्यांचं कुटुंब देखील फुटलं आहे. याचवेळी अजित पवार असंही म्हणाले की, 83 वय झालंय तर शरद पवार यांनी थांबलं पाहिजे. अजित पवार यांच्या याच वक्तव्याचा त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (ajit pawar advised sharad pawar retire challenged nephew ncp mla rohit pawar exclusive interview mumbai tak latest political news maharashtra)
मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत रोहित पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन बरंच सुनावलं आहे. जेव्हा शरद पवार यांना कोणी चॅलेंज करतं त्यावेळी ते तेवढ्याचे त्वेषाने लढण्यास सज्ज होतात. 2019 ला काय झालं होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. आता देखील पवार साहेबांना टार्गेट करण्यात आलं आहे. त्यावेळेसच पण त्यांचं वय जास्तच होतं ना.. पण वयाकडे काय बघता डोकं तेच आहे.. बघा आता पुढे जाऊन काय होतं ते.. असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना एक प्रकारे इशारच दिला आहे.
‘पवार साहेबांना चॅलेंज केलं की…’
‘मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर फार मोठा विश्वास आहे. त्यानंतर लोकांवर खूप विश्वास आहे. मला असं कुठेतरी वाटतं की, त्यांना जर कोणी चॅलेंज केलं तर साहेब शांत बसत नाही. तुम्ही जर पाहिलं तर 2019 च्या आधी एका भाजपच्या मोठ्या नेत्याने असं म्हटलं होतं की, पवार साहेबांचं राजकारण संपलं.. म्हणजे कुठे तरी पवार साहेबांना चॅलेंज केलं. आता परत एकदा अप्रत्यक्षपणे भाजप पवार साहेबांना टार्गेट केलं, चॅलेंज केलं कुटुंब फोडून आणि पक्ष फोडून. त्यामुळे बघा आता पुढे जाऊन होतंय काय.’
हे ही वाचा>> PM cares Fund: ‘वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठं’,ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल
‘एक सांगतो, महाराष्ट्रात जेव्हा एका व्यक्तीवर अन्याय होतो, कुटुंब फुटतं फक्त सत्तेत येण्यासाठी जर ते फोडलं जात असेल तर ही संतांची भूमी इथली लोकं म्हणजे आपण, मराठी जनता कधीही सहन करणार नाही.’ असं रोहित पवार यावेळी म्हणाले.