Ajit Pawar : ‘अजित पवारांना राष्ट्रवादीत आणण्याचा घाट’, भाजप नेत्याचा खळबळजनक खुलासा

योगेश पांडे

ADVERTISEMENT

ajit pawar bring back ncp sharad pawar plan bjp leader ashish deshmukh big revelation
ajit pawar bring back ncp sharad pawar plan bjp leader ashish deshmukh big revelation
social share
google news

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला जात आहे. मात्र याबाबतचा अंतिम निकाल निवडणूक आयोग देणार आहे. मात्र असे हेवेदावे सुरु असतानाच आता अजित पवारांना (Ajit pawar) राष्ट्रवादीत पुन्हा आणण्याचा घाट रचला जात असल्याचे विधान भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली. देशमुखांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.(ajit pawar bring back ncp sharad pawar plan bjp leader ashish deshmukh big revelation)

ADVERTISEMENT

अजित पवार अनेक आमदार घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडले. यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जीर्ण झाला. आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून मराठा समाजाला आड घेऊन शरद पवार राजकारण करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी यावेळी केला. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गृहमंत्र्यांवर खोटे आरोप करतायत. त्यामुळे अनिल देशमुखांनी तत्काळ मराठा समाजाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

हे ही वाचा : Maratha Morcha : ‘…तरच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या’, विजय वडेट्टीवारांची भूमिका काय?

ओबीसीत जे काही घटक आहे, त्यात कुणबी देखील आहे. त्यांना अगोदरच आरक्षण कमी आहे. 27 टक्क्यांपैकी 14 टक्केच आरक्षण आहे. पण मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, त्यासाठी वेगळं कोटा सरकारने करावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी सरकारकडे केली.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारच नाही, ओबीसीची विद्यमान टक्केवारी कमी झाली नाही पाहिजे. आजचे जे ओबीसींचे घटक आहेत, त्यांच्या आरक्षणाची टक्केवारी कायम राहिली पाहिजे. त्या व्यतिरीक्त मराठा समाजाला आरक्षण देण गरजेचे असल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

हे वाचलं का?

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आड स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचं काम होत असेल, तर यावेळेस टार्गेट अजित पवारांना करण्याचं काम शरद पवारांनी केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला. त्यासाठी आरक्षणला चिघळायचं, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करायची, अजित दादांवर दबाव आणायचा, ही भूमिका गेल्या काही दिवसातील घडामोडीतून दिसत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या आड घेऊन अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणि त्यांना सरकारमधून बाहेर पडून पुन्हा राष्ट्रवादीत नेण्याचा घाट शरद पवार रचत असल्याची खालीपुर्वक माहिती माझ्याकडे असल्याचे आशिष देखमुख यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला अल्टिमेटम! घेणार मोठा निर्णय

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT