चहामध्ये सोन्याचं पाणी घालता का? अजित पवारांचा शिंदेंना संतप्त सवाल
NCP | Ajit Pawar : मुंबई : वर्षा बंगल्याचं खानपानाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये. नेमकं काय केलं यांन? चहात सोन्याचं पाणी घालतं होतं का?,” असा संतप्त सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (२७ फेब्रुवारी) पासून सुरु होणार आहे. या […]
ADVERTISEMENT
NCP | Ajit Pawar :
ADVERTISEMENT
मुंबई : वर्षा बंगल्याचं खानपानाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये. नेमकं काय केलं यांन? चहात सोन्याचं पाणी घालतं होतं का?,” असा संतप्त सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (२७ फेब्रुवारी) पासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘मविआ’ची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (The budget session of the state legislature will begin from Monday (February 27). In this background, a joint meeting of ‘Mva’ was held.)
काय म्हणाले अजित पवार?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळताना अडचणी येत आहेत. अजूनही मदत पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. राजेंद्र चव्हाण या एक शेतकऱ्याने 512 किलो कांदा विकला आणि त्यांना केवळ २ रुपयांचा चेक मिळाला आहे आणि तो देखील 3 आठवड्यानंतर दिला आहे. त्याच्या कांद्याची विक्री 512 रुपयांची झाली आणि सर्व कट होऊन केवळ 2 रुपये देण्यात आले. तर नायगावच्या शेतकऱ्याने 4 क्विंटल कांदा विकला आणि त्याला विक्री करून वरती 350 रुपये गाडी भाडे द्यावे लागले.
हे वाचलं का?
Mumbai: ‘पोरगा झाला, माझ्यामुळेच झाला’, फडणवीसांच्या ठाकरेंना कानपिचक्या
नोकऱ्यांचं केवळं अमिष… :
यावेळी अजित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर टीका केली. ते म्हणाले, कारखाने अणू असं सरकारने म्हटलं होतं. माञ एकही कारखाना आला नाही. उलट राज्यातून कारखाने गेले. 75 हजार नोकऱ्यांची घोषणा केली पण केवळ घोषणाबाजी करण्यापुरती. जुमले बाजी करण्याचं काम सुरु आहे.
ADVERTISEMENT
विधानभवन,मुंबई येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना संदर्भात 'मविआ'ची आज संयुक्त बैठक पार पडली,या बैठकीस उपस्थित होतो. pic.twitter.com/n72ruHqoPi
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 26, 2023
ADVERTISEMENT
पैसा खर्च झालेला नाही…
विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याचा आरोप यावेळी अजित पवार यांनी केला. तसंच या राजकारणाचा विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले? याची माहिती काढावी. अजिबात निधी खर्च झालेला नाही. एका महिन्यात आर्थिक वर्ष संपत आहे. त्यामुळे खर्चाआभावी हा निधी परत जाणार आहे. सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही, असा आरोप त्यांनी केला.
Umesh Pal : उमेश यादवची बनला ढाल, 44 सेंकदात यूपीत घडलं हत्याकांड
चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का?
अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यातील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखा जोखा मांडला. ते म्हणाले, विकासकामं सोडून इतर गोष्टीवर खर्च केला जात आहे. जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. वर्षा बंगल्याच 4 महिन्यांचं खानपान बिल 2 कोटी 68 लाख रुपये आलं आहे. नेमकं काय केलं यांनी? चहात सोन्याचं पाणी घातलं होतं का? जाहिरातींवर 50 कोटी खर्च केले, मुंबई महापालिकेने 17 कोटी खर्च केले. एसटी महामंडळाकडून देखील पानभर जाहिराती देण्यात येत आहेत, याकडेही त्यांनी सरकराचं लक्ष्य वेधलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT