अजितदादांचा थेट पवारांवर हल्ला! ‘काहींनी 38 व्या वर्षी वसंतदादांना बाजूला सारलं अन् मी 60 व्या…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar direct target sharad pawar vasantdada patil government collapse baramati news maharashtra politics
ajit pawar direct target sharad pawar vasantdada patil government collapse baramati news maharashtra politics
social share
google news

Ajit Pawar Criticize Sharad Pawar : ‘मी 60 वर्षाचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली’. ‘तर काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला सारलं’, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्ला चढवला. तसेच तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय़ घेतला.त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या, असे देखील अजित पवार शरद पवारांना उद्देशून म्हणाले आहेत. (ajit pawar direct target sharad pawar vasantdada patil government collapse baramati news maharashtra politics)

ADVERTISEMENT

बारामतीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त व्यासपिठावरुन बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली. अजित पवार पुढे म्हणाले की, माझ्याबरोबर विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार आहेत. देवेंद्र भुयार आणि संजमामा शिंदे या दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंला दिला.विधानपरिषदेतील 9 पैकी 6 आमदार माझ्याबरोबर आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोक माझ्याबरोबर आली, मी कोणाला दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आले आहेत. आजूबाजू्च्या तालुक्याची परिस्थिती बघा, सत्तेचा फायदा आपल्यालाच होतोय, असे देखील अजितदादांनी यावेळी नमुद केले.

हे ही वाचा : HardiK Pandya : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर

इतके वर्ष बाकीच्यांच तुम्ही खूप ऐकलतं.आता इथून पूढे फक्त माझे ऐका बाकी कुणाचं ऐकू नका.तुम्ही मला आजपर्यंत भरभरून आशिर्वाद दिले आहेत. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल.इकडं पण तिकडं पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे आहे त्यानी यावं. मी जे काही करेन ते बारामतीकरांच्या हिताचेच करेल, असे देखील अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

हे वाचलं का?

मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते. तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली, अशा शब्दात अजितदादांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा : Mumbai Crime : मुंबई गँगवारने हादरली! चुनाभट्टी परिसरात अंदाधूंद गोळीबार; एक ठार, तीन जखमी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT