NCP Split : सुनील तटकरे म्हणाले, ‘सुप्रिया सुळेंना नैराश्य आलंय’
राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी. माननीय पंतप्रधानांची जी इच्छा आहे, तुम्ही पुर्ण करून टाका, मी तुम्हाला समर्थन देईन, असे थेट सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एकूणच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचे थेट आव्हानच भाजपला दिले होते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी संसदेत राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांची चौकशीची मागणी करण्याचे आव्हान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशच्या भोपालमध्ये राष्ट्रवादीवर जे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशीची मागणी केली होती. या मागणीने अजित पवार गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. (ajit pawar group minister sunil tatkare criticize supriya sule demand inquiry ncp scam narendra modi)
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नवीन संसदेतून बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule)म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी एनसीपीला नेचरली करप्ट पार्टी म्हटले होते. तसचे भोपालमध्ये मोदींनी सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्यासंदर्भात राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. तसेच तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. हे दोन नाही तर आणखीण चार देखील आहेत. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी. माननीय पंतप्रधानांची जी इच्छा आहे, तुम्ही पुर्ण करून टाका, मी तुम्हाला समर्थन देईन, असे थेट सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एकूणच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचे थेट आव्हानच भाजपला दिले होते.
हे ही वाचा : Women Reservation Bill : ‘विधेयकाला पाठिंबा, पण…’, सोनिया गांधी मोदी सरकारला काय म्हणाल्या?
दरम्यान सप्रिया सुळे या चौकशीची मागणी करत असताना समोरून सत्ताधारी नेत्यांमधून अजित पवारांचे नाव घेण्यात आले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही नात्याबद्दल गोष्ट नाही आहे, संसदेत माझे 800 भाऊ आहेत, एक थोडी आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिले. भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान मोदींच्या मनात जे दु:ख आहे,भ्रष्टाचारमुक्त भारत त्यांना करायचा आहे, यासाठी पुर्ण ताकदीने आम्ही त्याच्यासोबत उभं राहायला तयार आहोत,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
हे वाचलं का?
सुप्रिया सुळेंच्या या चौकशीच्या मागणीवर आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेलं नैराश्य अद्याप दुर झालेलं दिसत नाही. याबाबत चौकशी पुर्ण झाली असून न्यायालयाचे निर्णय़ही झाले आहेत. वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशाप्रकारची व्यक्तव्य येतात. हे विधान टाळता आलं असतं, असे देखील सुनील तटकरे म्हणाले आहेत.
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यही अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा मिळत असल्याचे देखील सुनील तटकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sanjay Raut : विधेयक आणलं, पण महिला राष्ट्रपतींनाच…, राऊतांचा मोदींवर निशाणा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT