Ajit Pawar: अजितदादांचा हट्ट, शिंदेंसाठी इकडे आड तिकडे… खातेवाटपाचं घोडं ‘इथे’ अडलंय!
अजित पवार हे सत्तेत सामील झाले असले तरी त्यांना अद्यापही कोणतंही खातं देण्यात आलेलं नाही. खरं तर अजित पवारांमुळे शिंदेंची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळेच खातेवाटप अद्यापही जाहीर होऊ शकलेलं नाही.
ADVERTISEMENT

मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 8 राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेत्यांच्या बंडाला 8 दिवस उलटून गेले. 2 जुलैच्या भर दुपारी अचानकपणे राजभवनावर या नेत्यांनी भाजप-शिवसेनेच्या सत्तेत प्रवेश करुन मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोन्ही कॅंम्पमध्ये जोरदार घमासान झालं. शरद पवारांनी येवल्यात सभा घेऊन भुजबळांसह अजितदादा कँपला आव्हान दिलं. रोहित पवार, जयंत पाटील आणि इतरांनी तुम्हाला काय कमी केलं म्हणून तुम्ही शरद पवारांना धोका दिला? अशा आशयाच्या मुलाखतीही दिल्या. पण आता या सगळ्याला आठ दिवस उलटून गेले तरीसुद्धा सरकारमध्ये सामील झालेल्यांनी अजूनही सरकार म्हणून काम का सुरु केलेलं नाहीए? म्हणजेच अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप का होत नाही? ते सध्या करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (ajit pawar joined power want finance and co operation ministry big issue for shinde group politics news maharashtra)
गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादीतलं बंड.. राष्ट्रवादीच्या बंडामुळे केवळ पक्ष फुटला नाही तर शरद पवारांचं घरही फुटलं.
पण आता हा सगळा इतिहास चर्चा करुन झालाय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे ती मंत्रिमंडळाचं खातेवाटप नेमकं अडकलंय कुठे याची. आजसुद्धा उर्जा खात्याचा एक जीआर जो हाती आला, त्यात सगळ्या मंत्र्यांची नावं लिहिली आहेत, मात्र त्यात नेमकं वित्त खात्यासमोर कुठल्याही नावाचा उल्लेख नाहीए. आणि इथंच मेख आहे..
कारण अजित पवार फायनान्स अर्थात वित्त (finance ministry) आणि सहकार खात्यासाठी (co operation ministry) अडून बसल्याची चर्चा आहे. म्हणजे त्यांना या दोन्ही खात्यांचा भार राष्ट्रवादीकडे असावा असा आग्रह आहे. आणि इथंच घोडं पेंड खातंय..