NCP: अजित पवारांची मोठी खेळी! थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सांगितला दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar play big game direct claim to the post of national president sharad pawar maharashtra politics
ajit pawar play big game direct claim to the post of national president sharad pawar maharashtra politics
social share
google news

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परीषदेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याची भूमिका मांडली होती. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) माझा फोटो वापरण्याची मुभा नसल्याचा पलटवार केला होता. पवारांच्या या भूमिकेनंतर आता अजित पवारांची मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकल्यानंतर आता अजित पवारांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावरच दावा सांगितला आहे. या संबंधित पत्र देखील अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला (Election Commision) दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगला राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोणाचा? शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर निर्णय द्यावा लागणार आहे. (ajit pawar direct claim to the post of national president sent letter to election commision sharad pawar maharashtra politics)

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत बंड झालं.या बंडानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा ठोकला होता. त्यानंतर आता अजित पवार गटाने मोठी खेळी केली आहे. अजित पवार गटाने थेट राष्ट्रीय अध्य़क्ष पदावरच दावा सांगितला आहे.

हे ही वाचा : ‘अजित पवारांचं नाणं खोटं म्हणून माझा फोटो लावला’, शरद पवारांचा पहिला हल्ला

अजित पवार यांनी शुक्रवारी 30 जून रोजी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला होता. या दिवशीच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकारीणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवार गटाने पक्ष लोकहिताच्या आपल्या उद्दिष्टांपासून दूर जात असल्याचा ठराव संमत करत, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून शरद पवार यांना हटवलं. यासोबतच अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. या संबंधित पत्र देखील अजित पवार गटाने निवडणूक आयोगाने त्याच दिवशी सुपुर्द केले आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान याआधी अजित पवार गटाच्या 40 आमदारांच्या सह्यांसह पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणारे पत्र निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. तर शरद पवार यांच्यावतीने एक कॅवेट दाखल करण्यात आली होती. यामध्ये आमची बाजू एकूण घेतल्याशिवाय कोणताही निर्णय़ घेऊ नये, अशी विनंती निवडणूक आय़ोगाकडे करण्यात आली होती. दरम्यान आता राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे यावर आता निवडणूक आयोग शरद पवार गटाच्या की अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : ‘NCPला सोनिया गांधींनी मुख्यमंत्री पद दिलेलं, पण साहेबांनी..’, अजित पवारांचा संताप

    follow whatsapp

    ADVERTISEMENT